विशेष प्रतिनिधी
मुंबई : उपराष्ट्रपती श्री सीपी राधाकृष्णन आणि राज्यपाल श्री जिष्णू देव वर्मा यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ येथे उपस्थिती दर्शवली आणि उपस्थितांना संबोधित केले. या पहिल्याच दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. उपराष्ट्रपती यांची उपस्थिती लाभल्याने या विद्यापीठाचे महत्त्व अधोरेखित होत असल्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.Maharashtra’s move towards self-reliance through skill-based education; Degrees awarded to students at the first convocation ceremony of Ratna Tata Skill University
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकासाचे महत्त्व ओळखून देशात कौशल्य विकास मंत्रालयाची स्थापना केली आणि ‘स्किल इंडिया’ ही व्यापक चळवळ उभी केली. महाराष्ट्रानेही या उपक्रमात पुढाकार घेत कौशल्य विकासाला प्राधान्य दिले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र सरकारने या विद्यापीठाची स्थापना करून कौशल्याधारित शिक्षणाला नवी दिशा दिली आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात असून, 10,000 महिलांना AI प्रशिक्षण देण्याचा उपक्रम विशेष उल्लेखनीय आहे.
सर्व क्षेत्रांमध्ये आघाडी घेण्यासाठी राज्यात कौशल्यसंपन्न मनुष्यबळ निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. स्पर्धेच्या युगात आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ महाराष्ट्र निश्चितपणे तयार करेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी विद्यापीठाचे अभिनंदन करून पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या, तसेच विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या प्रगतीसोबतच देशाच्या उन्नतीतही योगदान देण्याचा संकल्प मनात ठेवावा असे आवाहन केले.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या संस्थापक कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकर आदी मान्यवर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App