• Download App
    Monsoon Break 8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घट; पुढील 10 दिवस ब्रेक मिळण्याची शक्यता; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना मोठा सल्ला

    Monsoon Break : 8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घट; पुढील 10 दिवस ब्रेक मिळण्याची शक्यता; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना मोठा सल्ला

    Monsoon Break

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Monsoon Break  जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबई, ठाणे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला अतिवृष्टीने झोडपून काढले असले, तरी आता राज्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या ८ जुलैपासून महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर लक्षणीयरीत्या कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसाची ही विश्रांती किमान पुढील १० दिवस कायम राहण्याची शक्यता असून, या काळात अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे, अशी माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली आहे.Monsoon Break

    हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात (१५ जुलैपर्यंत) राज्याच्या काही भागांत धुवांधार पाऊस झाला असला, तरी दुसऱ्या पंधरवड्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी (अत्यल्प) राहू शकते. पाऊस कमी होणार असल्याने राज्यातील कमाल तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नागरिकांना काहीसा उकाडा सहन करावा लागू शकतो.Monsoon Break



    मुंबई आणि घाटमाथ्यावर पावसाने धुमाकूळ घातला असला, तरी राज्यातील अनेक भागांत अजूनही सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने खानदेश (धुळे आणि नंदुरबार), मध्य महाराष्ट्र (अहिल्यानगर व सोलापूर), पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांचा समावेश आहे, जिथे अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

    शेतकऱ्यांनो सावधान! जमिनीत ओलावा असल्याशिवाय पेरणीची घाई नको

    हवामानाची ही बदलती स्थिती पाहता राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची नियमावली आणि आवाहन जारी केले आहे. “राज्यातील ज्या भागांमध्ये अद्याप समाधानकारक आणि पुरेसा पाऊस झालेला नाही, तिथल्या शेतकऱ्यांनी केवळ ढगाळ वातावरण पाहून पेरणीची घाई करू नये. जोपर्यंत जमिनीत पेरणीयोग्य पुरेसा ओलावा निर्माण होत नाही, तोपर्यंत पेरणी थांबवावी. शेतकऱ्यांनी हवामानाच्या या कोरड्या स्पेलचा अंदाज घेऊनच आपल्या शेतीकामांचे आणि पुढील पिकांचे नियोजन करावे,” असे कृषी विभागाने म्हटले आहे.

    पावसामध्ये होणाऱ्या या घटमुळे रखडलेल्या शेतीकामांना गती मिळण्याची शक्यता असली, तरी कमी पावसाच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना मात्र पुढील पिकांसाठी पावसाच्या दुसऱ्या मोठ्या स्पेलची वाट पाहावी लागणार आहे.

    Monsoon Break in Maharashtra From July 8: IMD Predicts 10 Days of Low Rain

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Congress NSUI : काँग्रेसचा दादा भुसेंना अल्टिमेटम; 7 दिवसांत राजीनामा न दिल्यास घराबाहेर तीव्र आंदोलन, NSUI आणि युवक काँग्रेसचा थेट इशारा

    Rohit Pawar : MPSC पेपरफुटी की फेरपरीक्षेचा बनाव? आधी ई-मेलवरून आरोप, आता तक्रारच बनावट असल्याचा दावा

    Bombay High Court : “मतं मागता आणि निवडून आल्यावर लोकांचीच डोकी फोडता?”:मुंबई उच्च न्यायालयाने रमेश म्हात्रेंना फटकारले, वकिलांनाही सुनावले