Monsoon Break : 8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घट; पुढील 10 दिवस ब्रेक मिळण्याची शक्यता; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना मोठा सल्ला
जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबई, ठाणे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला अतिवृष्टीने झोडपून काढले असले, तरी आता राज्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या ८ जुलैपासून महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर लक्षणीयरीत्या कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसाची ही विश्रांती किमान पुढील १० दिवस कायम राहण्याची शक्यता असून, या काळात अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे, अशी माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली आहे.