विशेष प्रतिनिधी
मुंबई : MCOCA दुधामध्ये पाण्याची आणि घातक पदार्थांची भेसळ करून लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्यांविरुद्ध आता “मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत दिले. अंधेरीतील दूध भेसळ प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरल्यानंतर मंत्र्यांनी संबंधित घोषणा सभागृहात केली.MCOCA
आमदार मनीषा कायंदे यांनी अंधेरीतील भेसळयुक्त कारवाईच्या अनुषंगाने राज्याच्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शुद्ध व सुरक्षित दूध पुरवठा होणे आवश्यक असताना मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात असल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मंत्री झिरवाळ यांनी मुंबईतील कारवाईविषयी उत्तर देताना सांगितले की, वर्सोवा पोलिस ठाण्याच्या पथकासह ७ ठिकाणी छापा टाकला असता दूध भेसळीचा प्रकार उघड झाला. त्या वेळी निदर्शनास आले की, अमुल आणि गोकुळ ब्रँडमध्ये भेसळ झाल्याचे समोर आले. यात दूध भेसळीसाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले. तसेच या प्रकरणात १४ जणांना अटक करून ४ जणांना तडीपार करण्यात आले आहे.MCOCA
आमदार भाई जगताप आणि अनिल परब यांनी या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरले. हा केवळ भेसळीचा प्रकार नसून लोकांच्या जिवाशी खेळ आहे. हे संघटितपणे सुरू असेल तर सरकार दोषींना मकोका का लावत नाही ? तुम्ही अधिकाऱ्यांना वाचवत आहात का? असा संतप्त सवाल सदस्यांनी विचारला. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर मंत्री झिरवाळ यांनी मकोकांतर्गत कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
प्रशासनातील रिक्त पदांच्या मुद्द्यावरही मंत्र्यांनी माहिती दिली. प्रशासनात सध्या मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. एकूण २५४४ पदांची गरज असताना १२७३ पदे रिक्त आहेत. या पदभरतीची फाइल वित्त विभागाकडे पाठवण्यात आली आहे. त्रुटी दूर करून लवकरच नवीन आकृतिबंधानुसार ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. अलीकडेच १९७ जणांची भरती झाली असून त्यांचे ट्रेनिंग पूर्ण झाले असल्याचे त्यांनी या वेळी बोलताना सांगितले आहे.
भेसळखोरांवर वचक बसेल
‘मकोका’ मुळे दूध भेसळ ही केवळ भेसळ न राहता ‘संघटित गुन्हेगारी’मानली जाईल. यामुळे आरोपींना सहजासहजी जामीन मिळणार नाही आणि दोषसिद्धी झाल्यास जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते. गुन्हेगारांच्या मालमत्ता जप्त होऊन रॅकेटमधील मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचणे पोलिसांना सोपे होईल, ज्यामुळे अशा जीवघेण्या धंद्यांवर वचक बसून सार्वजनिक आरोग्य सुरक्षित राहील. आरोपींना आता सहजासहजी जामीन मिळणार नाही, ज्यामुळे तपासात अडथळे येणार नाहीत. दोषसिद्धी झाल्यास गुन्हेगारांना थेट जन्मठेपेपर्यंतच्या कठोर कारावासाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे भेसळघोखारांची आता खैर राहणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
दूध उत्पादनात ६३.८ टक्क्यांची वाढ
आर्थिक पाहणी अहवालानुसार, महाराष्ट्रातील दूध उत्पादन सन २०१५-१६ मधील सुमारे १०१.५२ लाख मेट्रिक टनांवरून वाढत, सन २०२४-२५ मध्ये तब्बल १६६.२६ लाख मेट्रिक टनांपर्यंत पोहोचले आहे. गेल्या दशकात ६३.८ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. त्याचबरोबर दरडोई दूध उपलब्धतेतही सुधारणा झाली असून प्रतिदिन २३९ ग्रॅमवरून ३८५ ग्रॅमपर्यंत वाढ झाली असून ४९.८ टक्के वाढ दर्शवते. पश्चिम महाराष्ट्र, नाशिक आणि पुणे विभाग आघाडीवर असून कोकण व विदर्भातील काही भागातही उत्पादनात वाढ होत आहे. मार्च २०२५ अखेर सहकारी संस्थांमार्फत दररोज सुमारे ५८.२५ लाख लिटर दूध संकलित होत असून खासगी डेअऱ्यांमधूनही मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App