नोकरीची संधी : महाराष्ट्राच्या आरोग्य विभागात 10000 पदांची भरती; वाचा वेळापत्रक

प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र सरकारने आरोग्य विभागात मेगाभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागातील तब्बल 10 हजार रिक्त जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. फेब्रुवारी – मार्च 2023 दरम्यान परीक्षा घेऊन या जागा भरण्यात येणार आहेत. Maharashtra Health Department Recruitment 10000 Posts; Read the schedule

असे आहे वेळापत्रक

1 ते 7 जानेवारी 2023 या काळात आरोग्य विभागातील भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर 25 ते 30 जानेवारी या काळात इच्छुक उमेदवारांच्या अर्जांची छाननी करण्यात येईल. 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार असून 25 आणि 26 मार्च 2023 साठी आरोग्य विभागातील विविध पदांसाठी भरती परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर 27 मार्च ते 27 एप्रिल 2023 या एका महिन्याच्या काळात उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

तरुणांची नाराजी दूर करण्यासाठी निर्णय

गेल्या तीन वर्षांपासून राज्याच्या विविध विभागांतील पदे रिक्त आहेत. त्यामुळे या पदांची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. साडे अकरा लाख तरुण भरती प्रक्रियेच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे तरुणांच्या या मुद्द्यांवर तोडगा काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे.

Maharashtra Health Department Recruitment 10000 Posts; Read the schedule

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात