LPG Supply : हॉटेल, ढाब्यासह उद्योगांना आजपासून वाढीव 20% गॅसपुरवठा; राज्याचा 30% कोटा आता 50% वर पोहोचला; व्यावसायिकांना संजीवनी

LPG Supply

विशेष प्रतिनिधी

मुंबई : LPG Supply राज्यातील हॉटेल व्यावसायिक, ढाबेचालक, अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी केंद्राने व्यावसायिक एलपीजी पुरवठ्यात २०% अतिरिक्त वाढ केली आहे. या निर्णयामुळे राज्याचा पूर्वीचा ३०% कोटा आता ५०% वर पोहोचला असून उद्यापासून म्हणजेच २३ मार्च २०२६ पासून याची अंमलबजावणी सुरू होईल.LPG Supply

इंधन टंचाईचा सामना करणाऱ्या व्यावसायिकांना या निर्णयामुळे मोठा आर्थिक आणि कार्यात्मक दिलासा मिळणार आहे. यापूर्वी आखाती युद्धामुळे गॅसची टंचाई निर्माण झाली होती. तेव्हा सरकारने घरगुती सिलिंडर पुरवठ्याला प्राधान्य देत व्यावसायिक गॅस पुरवठा थांबवला होता. त्यामुळे राज्यातील हजारो रेस्टाॅरंट, ढाबाचालक, छोटे-मध्यम उद्योजक संकटात सापडले होते. चार दिवसांपूर्वी या मुद्द्यावर विधानसभेत चर्चा झाली. तेव्हा ८-१० दिवसांत पुरवठा सुरळीत होईल, असा दावा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला होता.LPG Supply



या निर्णयाचा लाभ कोणाला?

– हॉटेल, ढाबे आणि उपाहारगृहे, औद्योगिक कॅन्टीन आणि अन्न प्रक्रिया उद्योग, दुग्धव्यवसाय क्षेत्र, शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची अनुदानित कॅन्टीन, कम्युनिटी किचन आणि स्थलांतरित मजुरांसाठीच्या भोजन योजना.

किती गॅस मिळणार आहे?

यापूर्वी व्यावसायिकाला त्याच्या सरासरी वापराच्या ३०% पुरवठा मिळत होता. आता एकूण ५०% एलपीजी पुरवठा होईल.

पण यासाठी कोणत्या अटी टाकल्या आहेत?

वाढीव कोट्याचा लाभ घेण्यासाठी दोन अटी महत्त्वाच्या आहेत. तेल कंपन्यांकडे (एचपीसीएल, आयओसीएल इ.) नोंदणी असणे अनिवार्य आहे. संबंधित व्यावसायिकाने पीएनजी (पाइप नॅचरल गॅस) कनेक्शनसाठी अर्ज केलेला असावा आणि ते कनेक्शन घेण्याची तयारी दर्शवलेली असावी. यातून केंद्राला व्यावसायिक सिलिंडर वापराचा नेमका आकडा कळेल.

Maharashtra Commercial LPG Supply Rises to 50%; Relief for Hotels & Dhabas VIDEOS

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात