कोरोनाची लस घेतलीही नाही आणि घेणारही नाही, असं इंदोरीकर महाराज 3 नोव्हेंबर रोजी म्हणाले होते. Letter to CM from Beed farmer’s son; Said – ‘… don’t let Indurikar Maharaj’s kirtan happen till then’
विशेष प्रतिनिधी
बीड : गेल्या काही महिन्यांपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू असल्याने रुग्ण संख्या कमी झाली आहे. लोकांनी कोरोनाची लस घ्यावी म्हणून मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू आहे. दरम्यान कोरोनाची लस घेतलीही नाही आणि घेणारही नाही, असं इंदोरीकर महाराज 3 नोव्हेंबर रोजी म्हणाले होते.
त्यांच्या याच वक्तव्याविरोधात आता बीडमधील एका शेतकरी पुत्राने चक्क जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत, जोपर्यंत इंदुरीकर महाराज कोरोनाची लस घेणार नाही तोपर्यंत त्यांचे कीर्तन होऊ देऊ नका, अशी मागणी केली आहे.
3 नोव्हेंबरला आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात इंदुरीकर महाराज म्हणाले की, “कोरोनाच्या काळात सुशिक्षित लोक आपले प्रियजणांसोबत अत्यंत चुकीचं वागले. आपल्या कुटुंबातील प्रिय व्यक्तींना, जवळच्या लोकांना दूर ठेवलं.””कोरोना झालेल्या लोकांना चांगल्या ताटात जेवण दिलं नाही. त्यांच्या गोधड्या जाळून टाकल्या. त्यांच्या हातांना स्पर्श होणार नाही, इतकं फटकून त्यांच्याशी वागले. पण मी अजूनही कोरोनाची लस घेतली नाही आणि घेणारही नाही.”
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App