विशेष प्रतिनिधी
पुणे : Kundmala Bridge Accident मावळमधील कुंडमाळा गावाजवळ मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 40 पेक्षा जास्त लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच, यातील 38 जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 38 जणांना किरकोळ जखमा झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एक गंभीर जखमी असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली आहे. तसेच, या दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये मदत देणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी डूडी यांनी दिली.Kundmala Bridge Accident
मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखाची मदत जाहीर
आज रविवार असल्याने या ठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. जेव्हा ही घटना घडली तेव्हा अंदाजे 50 च्या आसपास पर्यटक या पुलावर होते. तसेच काहीजणांनी या पुलावर आपली बाईक देखील घातली. वजन वाढल्यामुळे हा पूल कोसळल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या घटनेत मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांच्या मदतीची घोषणा करण्यात आल्याची माहिती जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिली.
जिल्हाधिकारी डूडी म्हणाले- ही घटना दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान घडली आहे. घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलिस विभाग आणि महसूल विभाग घटनास्थळी हजर झाले. तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. काही लोक इथे पर्यटनासाठी आले होते. यादरम्यान हा पूल कोसळला आणि पर्यटक नदीतपात्रात पडले.
38 पर्यटकांना वाचवण्यात यश, बचावकार्य सुरूच
डूडी म्हणाले- आतापर्यंत 38 लोकांना वाचवण्यात यश आले आहे, यातील अधिकांश पर्यटकांना किरकोळ स्वरूपाची दुखापत झाली आहे. तर या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याठिकाणी आधीच आपण बंदीचे आदेश लागू केले होते. दहा दिवसांपूर्वीच त्या संदर्भात आपण आदेश जारी केल्याचेही त्यांनी सांगितले. पर्यटकांनी अशा धोक्यांच्या जागी जाऊ नये, असे आधीच सांगण्यात आले होते. ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबाला शासनातर्फे पाच लाखांची मदत केली जाणार आहे, या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत. तसेच, जखमी व्यक्तींवर मोफत उपचार केले जातील, अशी माहिती जिल्हााधिकाऱ्यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App