• Download App
    पत्नी झोपली चाकू घेऊन बेडरुममध्ये : पतीची पोलिसांत धाव|Kothrud area in one family wife sleeping with knife..husband complaint her wife into police station

    पत्नी झोपली चाकू घेऊन बेडरुममध्ये : पतीची पोलिसांत धाव

    पत्नी बेडरुममध्ये चाकू घेऊन झोपल्याने घाबरलेलंया पतीने थेट पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. यानंतर पोलिसांनी दोघांनाही पोलीस ठाण्यात बोलावून जबाब नोंदवला.


    विशेष प्रतिनिधी

    पुणे- पत्नी बेडरुममध्ये चाकू घेऊन झोपल्याने घाबरलेलंया पतीने थेट पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. यानंतर पोलिसांनी दोघांनाही पोलीस ठाण्यात बोलावून जबाब नोंदवला. याचा राग आल्याने पत्नीने माहेरच्या लोकांच्या मदतीने पतीला बेदम मारहाण केली. यानंतर पतीच्या घरातील दोन लॅपटॉप, सोने आणि घड्याळ असा 1 लाख 59 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.Kothrud area in one family wife sleeping with knife..husband complaint her wife into police station

    याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात पत्नी, मेव्हणी,मेव्हणा, सासू-सासरे, निखील शर्मा आणि अशोक मरकडे (सर्व रा. औरंगाबाद) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी पती जितेंद्र भागवत (32,रा. कोंढवा) याचे पत्नीबरोबर विवाहानंतर नेहमी घरगुती वाद होत होते. या वादातून अनेकदा त्याचे सासरच्या लोकांशीही भांडणे झाली होती. त्याच्या सासरचे लोक नेहमी संसारात हस्तक्षेप करत होते.



    तसेच फिर्यादीच्या आईस तुच्छ वागणूक देत होते. दरम्यान त्यांची पत्नी 8/7/2022 रोजी बेडरुममध्ये चाकू घेऊन झोपली होती. यावेळी फिर्यादीने पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क साधला होता. दोघांनाही पोलीस स्टेशनला बोलावल्यावर फिर्यादीच्या पत्नीने फिर्यादीविरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता.

    यानंतर सर्व आरोपीने फिर्यादीच्या घरी जाऊन त्यांच्या आईस शिवीगाळ केली. तसेच फिर्यादीस लाथा-बुक्‍क्‍वयांनी मारहाण केली. यानंतर घरातील 1 लाख 59 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस साळवे तपास करत आहे.

    Kothrud area in one family wife sleeping with knife..husband complaint her wife into police station

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Home and Car Loans : 62 लाख कर्जदारांना बसणार फटका? गृहकर्ज आणि वाहनकर्ज मिळवणे होणार कठीण; बँकांच्या नव्या नियमांची तयारी

    NEET Paper Leak : NEET पेपरफुटीनंतर NTA च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल; CCTV, लॉकडाऊन, डिजिटल ट्रॅकिंगसह नवे सुरक्षा कवच

    कबड्डी प्लेयर वगैरे ठीक आहे, पण छगन भुजबळांना हवाय राष्ट्रवादीतल्या घराणेशाहीचा “न्याय”!!