प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघात सुरूवातीच्या 9 फेऱ्यांमध्ये काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्यावर साडेनऊ हजार मतांची आघाडी घेतली आहे. नवव्या फेरी अखेरीस जयश्री कदम यांनी 31000 मते मिळवली आहेत, तर सत्यजित कदम यांना 22 हजार मते मिळाली आहेत. Kolhapur North: Congress’ Jayashree Jadhav leads; Satyajit steps back from BJP
पालकमंत्री सतेज पाटील यांचे वर्चस्व असणाऱ्या कसबा बावडा परिसरात जयश्री जाधव यांचे मताधिक्य अपेक्षेपेक्षा थोडे कमी राहिले. परंतु, चंद्रकांत जाधव यांच्या सहानुभूतीची लाट त्यांच्या मदतीला आली, असे बोलले जात आहे.
तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी चंद्रकांत दादापाटील यांच्यासह मतदार संघात तळ ठोकला होता. मात्र त्याचा अपेक्षित परिणाम अद्याप तरी दिसलेला नसून मताधिक्यचे पारडे हेलकावे खाताना दिसत आहे.
महाविकास आघाडीचा विजय होईल, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे, तर शिवसेनेने मला बहीण मानले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरून आदेश काढले. परिणामी शिवसैनिकांनी माझा प्रचार केला, असे जयश्री जाधव म्हणाल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App