• Download App
    Kirit Somaiya : संभाजीनगरात 700 बोगस जन्म प्रमाणपत्रांचे वाटप, किरीट सोमय्यांनी महापौरांकडे केली चौकशीची मागणी – The Focus India

    Kirit Somaiya : संभाजीनगरात 700 बोगस जन्म प्रमाणपत्रांचे वाटप, किरीट सोमय्यांनी महापौरांकडे केली चौकशीची मागणी

    Kirit Somaiya

    विशेष प्रतिनिधी

    छत्रपती संभाजीनगर : Kirit Somaiya छत्रपती संभाजीनगर महापालिकेतून ७०० बोगस जन्म प्रमाणपत्रे वाटली गेल्याचा गंभीर आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमवारी त्यांनी महापौर समीर राजूरकर यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.Kirit Somaiya

    मागील दोन वर्षांत तब्बल १६ हजार संशयित प्रमाणपत्रांचे वाटप झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. सोमय्या यांनी या वेळी जिल्ह्यातील ‘मोहळा’’’’ गावाचे उदाहरण दिले. या गावाची एकूण लोकसंख्या कमी असताना तिथल्या नावावर वाटलेली प्रमाणपत्रे मात्र अधिक आहेत.Kirit Somaiya



    मनपाच्या जुन्या रेकॉर्डमध्ये १६,००० संशयास्पद नावे वाढवण्यात आल्याची बाब त्यांनी समोर आणली. या घोटाळ्यात आतापर्यंत १०,००० लोकांना आरोपी बनवण्यात आले आहे.

    “छत्रपती संभाजीनगर शहरात कारवाई सुरू झाली असली तरी सिल्लोडमध्ये अद्याप कोणतीही ठोस कारवाई का झाली नाही?’ असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला. हे बोगस प्रमाणपत्र तत्काळ रद्द करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

    700 Fake Birth Certificates Issued in Sambhajinagar: Kirit Somaiya Demands Probe

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    NEET exam : नीट परीक्षेतील गुण घोटाळ्याचे दावे पूर्णपणे निराधार; हायकोर्टाने 4 याचिका फेटाळल्या; बनावट कागदपत्रांमुळे विद्यार्थ्यांना ठोठावला दंड

    Maharashtra Loan Waiver Scheme : आयकरदाते 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरले; सहकार विभागाकडून 32 लाख बळीराजाची डेटा पडताळणी

    Earthquakes : नाशिकमध्ये गुरुवारी दोनदा भूकंपाचे धक्के; 6 दिवसांत 10 वा हादरा बसला; सुरगाणा तालुक्यात भूकंपाचे केंद्र