Jayant Patil : जयंत पाटलांचा दावा- एकेका मतदाराला 8-8 वेळा मतदानाचा हक्क; आयोगाचे सर्व्हर दुसरेच कुणीतरी ऑपरेट करत असल्याचा आरोप

Jayant Patil

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Jayant Patil  महाराष्ट्रात एकेका मतदाराला 8-8 वेळा मतदानाचा हक्क देण्यात आला आहे. त्यामुळे राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्व्हर महाराष्ट्रात दुसरेच कुणीतरी ऑपरेट करत असल्याचा संशय आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना केला. Jayant Patil

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी वरील आरोप केला. ते म्हणाले, आम्ही महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्षांनी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांना आम्ही एक निवेदन दिले. त्याद्वारे त्यांना महाराष्ट्रातील मतदारयाद्यांमधील अनेक चुका दाखवल्या. त्यावर त्यांनी सीओ यांनी आम्हाला हा मुद्दा केंद्रीय निवडणूक आयोगापुढे मांडण्याची ग्वाही दिली. तसेच या याद्या दुरुस्त करण्याचे काम लवकरात लवकरक सुरू करण्याचे आश्वासनही दिले. Jayant Patil



आम्ही निवडणूक आयोगाला काही महत्त्वाचे पुरावे दाखवले. त्या पुराव्याच्या सहीत आम्ही त्यांना काही माहिती दिली. याशिवाय आम्ही एक पत्रही त्यांना दिले आहे. त्यात मतदार यादीमधील मतदारांचे पत्ते अपूर्ण, घर क्रमांक चुकीचे आहेत. तसेच संबंधित व्यक्तीचा मतदार यादीत पत्ता व प्रत्यक्ष वस्तुस्थिती यात फरक असल्याचेही आम्ही आयोगाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

Jayant Patil claims – Each voter has the right to vote 8 times; Allegations that someone else is operating the Commission’s servers

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात