निवडणूक चिन्ह गेल्याने फरक पडत नाही!!; पवारांचा ठाकरे गटाला दिलासा; पवार राजकीय बर्मुडा ट्रँगल; शिवतारेंचा टोला!!

प्रतिनिधी

संभाजीनगर : निवडणूक चिन्ह गेल्याने काही फरक पडत नाही, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाला दिलासा दिला आहे. शिवसेनेत दोन गट झाल्यानंतर निवडणूक चिन्ह गोठवले जाणार निवडणूक आयोग तसा निर्णय देणार याचा अंदाज आपल्याला होताच. केंद्रात भाजपचे सरकार असल्यावर असा निर्णय होणे अपेक्षितच होते, अशी टिप्पणी देखील शरद पवारांनी संभाजीनगर मध्ये केली.It doesn’t matter if the election symbol is gone!!; Pawar’s relief to Thackeray group; Pawar Political Bermuda Triangle; A bunch of shivtars



शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर पवारांनी भाष्य केले. ते म्हणाले, की निवडणूक चिन्ह गेल्याने कोणत्या पक्षाला फारसा फरक पडत नाही. मी स्वतः पाच निवडणूक चिन्हांवर निवडणूक लढवून जिंकून आलो. सुरुवातीला काँग्रेसचे बैलजोडी चिन्ह होते. त्यानंतर गाय वासरू, चरखा, हाताचा पंजा आणि आता घड्याळ अशा निवडणूक चिन्हांवर मी निवडणूक लढवून जिंकून आलो आहे. त्यामुळे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवले गेले असले तरी शिवसेनेला फरक पडत नाही, असा दावा शरद पवारांनी केला आहे.

 पवार राजकारणातले बर्मुडा ट्रँगल

तर शरद पवार हे राजकारणातल्या बर्मुडा ट्रँगल आहेत. शिवसेना संपवण्याचा त्यांचे 2014 पासून कारस्थान होते. शिवसेनेला निवडणूक चिन्ह आणि नाव गमवायला लावून त्यांच्यासारखी मोठे माणसे नेमके काय करतील सांगता येत नाही!!, असा टोला पुरंदरचे माजी आमदार माजी मंत्री आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी लगावला आहे.

It doesn’t matter if the election symbol is gone!!; Pawar’s relief to Thackeray group; Pawar Political Bermuda Triangle; A bunch of shivtars

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात