विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अमेरिका आणि इजरायल यांनी इराणवर हल्ला करून इराणचा सर्वोच्च नेता आयतुल्लाह खामेनी याला संपविल्यानंतर तिथे इस्लामिक राजवट बदलायची नांदी झाली असून इराणचे युवराज रेझा पहलवी कोणत्याही क्षणी इराणमध्ये जायला तयार झालेत. त्यांनी स्वतःच फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत आपण इराणमध्ये जायला उत्सुक असल्याचे सांगितले. Prince Reza Pahlavi
इराण मध्ये 1972 मध्ये इस्लामिक क्रांती झाल्यानंतर पहलवी कुटुंबीयांनी अमेरिकेत आश्रय घेतला. रेझा पहलवी हे इराणचे युवराज असून ते इराणच्या राजगादीचे वारस आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर केलेल्या हल्ल्याचे रेझा पहलवी समर्थन केले असून इराणमध्ये लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी आपण उत्सुक आहोत. आपली लोकशाहीवादी इराणचे नेतृत्व करण्याची तयारी आहे तिथले सगळे निर्बंध हटवून एक धर्मनिरपेक्ष इराण प्रस्थापित करण्यासाठी आपण योगदान देऊ इच्छितो असे रेझा पहलवी यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.
इराण मधल्या इस्लामिक राजवटीने त्या देशाचे फार नुकसान केले. त्यांनी कोट्यावधी इराणी नागरिकांना बंधक बनविले. त्यांचे सर्व प्रकारचे स्वातंत्र्य हिरावून घेतले. इराणला जगापासून तोडून टाकले. इराणची मुळात अशी जगापासून तुटायची संस्कृतीच नाही. इराण ने कायम जगाला प्रकाश दाखविला. तिथल्या इस्लामिक राजवटीचा शेवट झाला की ताबडतोब आपल्याला तिथे जायचे आहे तिथल्या लोकशाहीवादी लोकांना भेटायचे आहे इराणमध्ये लोकशाही राजवट प्रस्थापित करून तिचे नेतृत्व करायचे आहे, असे वक्तव्य रेझा पहलवी यांनी केले.
Prince Reza Pahlavi speaking to Fox and Friends this morning. https://t.co/EY36a9QMSy — Reza Pahlavi Communications (@PahlaviComms) March 2, 2026
Prince Reza Pahlavi speaking to Fox and Friends this morning. https://t.co/EY36a9QMSy
— Reza Pahlavi Communications (@PahlaviComms) March 2, 2026
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App