Iran war effect : पेट्रोल डिझेलचे भाव नाही वाढणार, केंद्र सरकारचा निर्वाळा; गॅस पुरवठ्याच्या नियोजनासाठी महत्त्वपूर्ण सूचना!!

Iran war effect

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अमेरिका, इजराइल विरुद्ध इराण संघर्षामुळे जागतिक  बाजारावर मोठा परिणाम झालाय. या परिस्थितीचा फटका भारतातील इंधन आणि गॅस पुरवठ्यावरही जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने भारतीय ग्राहकांना दिलासादायक अशी बातमी दिली असून पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढण्याची शक्यता नसल्याचा निर्वाळा दिला.Iran war effect: Petrol and diesel prices will not increase, central government confirms; Important instructions for planning gas supply!!

इराणने मोर्तूझची खाडी बंद केल्याने तिथली तेल वाहतूक थांबली असली तरी पर्यायी मार्गाने भारताने तेल वाहतूक सुरू करून 10 % तेलाची भरपाई केली असून रशियाकडून सुद्धा भारताने तेल आयात केले आहे. त्यामुळे मुळे भारतात तेल टंचाई निर्माण होण्याची शक्यता नसून पेट्रोल आणि डिझेलचे भाव सुद्धा वाढणार नाही, असा निर्वाळा केंद्र सरकारच्या सूत्रांनी दिला. त्यामुळे भारतीय ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला.



– गॅस पुरवठ्याबाबत महत्त्वाच्या सूचना

वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गॅस पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली, या पार्श्वभूमीवर देशातील गॅस वितरण सुरळीत ठेवण्यासाठी गॅस कंपन्या आणि डिलर्स यांच्या बैठका घेतल्या. या बैठकीत ग्राहकांना त्रास होऊ नये आणि उपलब्ध साठ्याचा योग्य वापर व्हावा यासाठी काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र या सूचनांमुळे वितरण पद्धतीत काही बदल होणार असल्याचेही समोर येत आहे.

गॅस वितरणात बदलाची तयारी

अलीकडे झालेल्या डिलर्स बैठकीत गॅस वितरणाबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. गॅसचा साठा मर्यादित असल्याने पुरवठा व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी कंपन्यांनी वितरण प्रक्रियेत काही नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये दोन गॅस सिलेंडरच्या वितरणामध्ये किमान 21 दिवसांचे अंतर ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे. म्हणजेच ग्राहकांनी एक सिलेंडर घेतल्यानंतर पुढील सिलेंडर मिळण्यासाठी 21 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. यामुळे उपलब्ध गॅस अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

ओटीपी प्रणाली अनिवार्य

गॅस वितरणात पारदर्शकता ठेवण्यासाठी ओटीपी प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिलेंडर वितरण करताना ग्राहकांना ओटीपी सांगणे आवश्यक राहणार आहे. यामुळे बोगस ग्राहक किंवा गैरवापर ओळखणे सोपे होईल, असे कंपन्यांचे म्हणणे आहे.

तसेच ग्राहकांनी शक्य तितक्या काटकसरीने गॅसचा वापर करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. सध्या जागतिक परिस्थिती पाहता गॅसचा वापर नियोजनबद्ध पद्धतीने करण्याची गरज असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

– व्यावसायिक सिलेंडर वितरणावर तात्पुरती मर्यादा

सध्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या वितरणावर तात्पुरती मर्यादा घालण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्यामुळे काही काळ व्यावसायिक वापरासाठी सिलेंडर पुरवठा मर्यादित राहू शकतो. यामागील उद्देश घरगुती ग्राहकांना प्राधान्य देण्याचा असल्याचे सांगितले जात आहे.

देशात सध्या गॅसचा पुरवठा मुख्यतः भारत सरकारच्या ‘भारत गॅस’, ‘एचपी गॅस’ आणि ‘इंडियन गॅस’ या तीन कंपन्यांकडून केला जाणार आहे. या कंपन्यांच्या माध्यमातूनच नियमित वितरण चालू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

खाजगी कंपन्यांचे वितरण थांबले

दरम्यान काही खाजगी गॅस कंपन्यांचे वितरण सध्या थांबवण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. ‘टोरंटो गॅस’, ‘रिलायन्स गॅस’, ‘महेश गॅस’ आणि ‘गो गॅस’ या कंपन्यांकडून होणारे वितरण सध्या बंद ठेवण्यात आले आहे. यासोबतच ग्राहकांनी घाबरून गॅस सिलेंडरचा अतिरिक्त साठा करू नये, असेही स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर लवकरच गॅस पुरवठा पुन्हा सुरळीत होईल, अशी माहिती डिलर्स बैठकीत देण्यात आली.

Iran war effect: Petrol and diesel prices will not increase, central government confirms; Important instructions for planning gas supply!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात