income tax department : प्राप्तिकर विभागाने महाराष्ट्र आणि गोवास्थित एका ग्रुपच्या परिसरात छापे0 टाकले आहेत. 25 ऑगस्ट रोजी छापेमारीची कारवाई झाली. पुणे, नाशिक, अहमदनगर आणि गोवा येथे प्रमुख स्टील उत्पादक आणि व्यापारी ग्रुपवर ही कारवाई करण्यात आली. ग्रुपच्या तब्बल 44 हून अधिक ठिकाणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. income tax department conducts searches in maharashtra and goa
वृत्तसंस्था
मुंबई : प्राप्तिकर विभागाने महाराष्ट्र आणि गोवास्थित एका ग्रुपच्या परिसरात छापे0 टाकले आहेत. 25 ऑगस्ट रोजी छापेमारीची कारवाई झाली. पुणे, नाशिक, अहमदनगर आणि गोवा येथे प्रमुख स्टील उत्पादक आणि व्यापारी ग्रुपवर ही कारवाई करण्यात आली. ग्रुपच्या तब्बल 44 हून अधिक ठिकाणांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
शोध आणि जप्तीच्या कारवाईदरम्यान अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे, खुली कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले. या पुराव्यांवरून हे उघड झाले की, हा ग्रुप बनावट पावती जारी करणाऱ्यांकडून स्क्रॅप आणि स्पंज आर्यनची बनावट खरेदी करून फसवणूक करत होता.
शोधादरम्यान बनावट चालान जारी करणाऱ्यांच्या ठिकाणांवर छापेही टाकण्यात आले. या चालान जारी करणाऱ्यांनी कबूल केले की, त्यांनी फक्त बिले भरली, परंतु कोणतेही साहित्य दिले नाही. याव्यतिरिक्त बनावट ई-वे बिलदेखील खरी खरेदी म्हणून दर्शविण्यासाठी आणि जीएसटी इनपुट क्रेडिटवर दावा करण्यासाठी तयार केले गेले. जीएसटी प्राधिकरण पुणे यांच्या मदतीने बनावट ई-वे बिले ओळखण्यासाठी ट्रॅकिंग अॅपचा वापर करण्यात आला.
आतापर्यंत एकूण सुमारे 160 कोटी रुपये किमतीची बनावट खरेदीची ओळखण्यात आली आहे. कारवाई अद्याप सुरू असून कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. म्हणजेच आता ही किंमत आणखी वाढू शकते. 3.5 कोटी रुपयांच्या वस्तूंची कमतरता आणि 4 कोटी रुपयांचा अतिरिक्त साठाही छाप्यांदरम्यान सापडला.
छाप्यांदरम्यान, आयटीला मालमत्तेतील बेहिशेबी गुंतवणुकीची माहितीही मिळाली. याशिवाय 3 कोटी रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. ग्रुपला याचा हिशेब करता आला नाही. त्याचबरोबर विविध ठिकाणांहून 5.20 कोटी रुपयांचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत.
शोधादरम्यान 194 किलो चांदीच्या वस्तू सापडल्या. त्याची किंमत 1.34 कोटी असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत एकूण 175.5 कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न आढळून आले आहे, ज्यात बेहिशेबी रोख आणि दागिने, स्टॉक आणि फसव्या खरेदीचा समावेश आहे.
income tax department conducts searches in maharashtra and goa
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App