• Download App
    Devendra Fadnavis महा-चतुर AI चॅटबॉट कौशल्य, रोजगार आणि उद्योजकतेसाठी नवे व्यासपीठ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण

    महा-चतुर AI चॅटबॉट कौशल्य, रोजगार आणि उद्योजकतेसाठी नवे व्यासपीठ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीने शिकाऊ उमेदवारी (Apprenticeship) क्षेत्रात नाविन्यपूर्ण बदल घडवण्यासाठी आणि रोजगाराभिमुख उमेदवारांचा वेळ वाचण्यासाठी तयार करण्यात आलेल्या महा-चतुर AI चॅटबॉटचे लोकार्पण करण्यात आले.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महा-चतुर एआय चॅटबॉट मुळे कौशल्य, रोजगार व उद्योजकतेला नवी गती मिळेल. राज्यातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणारा ‘महा-चतुर’ एआय चॅटबॉट हा महाराष्ट्रासाठी परिवर्तनकारी उपक्रम आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या पुढाकारातून विकसित करण्यात आलेला हा चॅटबॉट देशातील राज्य शासनाने तयार केलेला अशा प्रकारचा पहिलाच अभिनव उपक्रम आहे. या चॅटबॉटमुळे युवा वर्गाचा शिक्षण ते रोजगार हा प्रवास अधिक सुकर होईल आणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ त्वरित उपलब्ध होईल.



    – युवाशक्तीला अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी

    भारताची 65 % लोकसंख्या 35 वर्षांखालील असून ही देशाच्या विकासासाठी मोठी संधी आहे. या युवा शक्तीला कौशल्य प्रशिक्षण देऊन अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक असून त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने कौशल्य विकासाला प्राधान्य दिले आहे. विशेषतः रोजगाराभिमुख युवकांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी हा चॅटबॉट उपयुक्त ठरणार असून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तो सर्वांसाठी सहज उपलब्ध असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल, सेंटर ऑफ एक्सलन्स, आयटीआय आधुनिकीकरण, महिलांचा कौशल्य उपक्रमात सहभाग वाढविणे, तसेच विविध भागीदारींमुळे कौशल्य क्षेत्राला बळ मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जगातील तिसाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून आगामी काळात अधिक मोठी झेप घेण्यासाठी कौशल्य विकास विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. महाचतुर हे नाव जितके सुंदर तितकाच हा उपक्रम दूरदृष्टीचा असून महाराष्ट्राला कौशल्य, रोजगार आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात नवी दिशा देणारा ठरेल.

    यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, जपानच्या महावाणिज्यदूत हितोमी सातो, जर्मनीचे महावाणिज्यदूत क्रिस्टोफ हॅलियर, रिपब्लिक ऑफ कोरियाचे महावाणिज्यदूत यू डोंगवान आणि फिनलंडचे महावाणिज्यदूत एरिक अफ हेल्स्ट्रॉम आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    Inaugurated by Chief Minister Devendra Fadnavis

    Related posts

    Raghav Chadha : राघव चड्ढा म्हणाले- ‘आप’ काही भ्रष्ट-कॉम्प्रमाइज्ड लोकांचा पक्ष बनला; वैयक्तिक फायद्यासाठी काम करताहेत

    Nashik TCS : नाशिक TCS धर्मांतर प्रकरण:आरोपी निदा खानच्या जामिनावर 2 मे रोजी निकाल; न्यायालयात सुनावणी पूर्ण

    Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले- ादग्रस्त वक्तव्यावर धीरेंद्र शास्त्रींचा माफीनामा, शिवप्रेमी मोठ्या मनाने माफ करतील