विशेष प्रतिनिधी
पुणे –पुणे जिल्हयातील हवेली तालुक्यात वाघाेली येथे राहत असलेल्या एका कुटुंबातील पतीला पत्नीने मटण आणून स्वयंपाक करुन दिला नाही म्हणून पतीने तिला बेदम मारहाण करत तिला सुरीने दुखापत केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पत्नी सागर कैलास धिंडे (वय-३१) यांनी पती कैलास गंगाराम धिंडे (३९) यांचे विराेधात लाेणीकंद पाेलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली आहे.In wagholi area Wife not make meat Dinner the husband angry and beaten the wife
सागर धिंडे व कैलास धिंडे हे पती-पत्नी असून कैलास दिंडे यांना पत्नीने मटण आणून स्वयंपाक करुन दिला नाही म्हणून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करुन शिवीगाळ केली. त्यानंतर स्वंयपाक घरातील सुरीने पत्नीच्या उजवे हाताचे तळव्यास आपखुशीने दुखापत करुन तु इथे राहिली तर तुला बघून घेईल अशी धमकी दिली आहे. याप्रकरणी लाेणीकंद पाेलीस पुढील तपास करत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App