काेंढवा परिसरातील एका शाळेतील वर्गाच्या माॅनिटरने वर्गातील काही मुलांना शाळेत येताना हेअर कटिंग करुन का आले नाही अशी विचारणा केली.यावरुन विद्यार्थ्यांनी माॅनिटरला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे
विशेष प्रतिनिधी
पुणे -काेंढवा परिसरातील एका शाळेतील वर्गाच्या माॅनिटरने वर्गातील काही मुलांना शाळेत येताना हेअर कटिंग करुन का आले नाही अशी विचारणा केली. यावरुन विद्यार्थ्यांनी माॅनिटरला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी काेंढवा पाेलीस ठाण्यात दाेन अल्पवयीन मुलांसह चारजणां विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. In kondhva area one school class moniter beaten by school children’s and others
याबाबत वर्गाचा माॅनिटर असलेल्या १४ वर्षीय सुमीत (नाव बदलले) याच्या ४० वर्षीय वडीलांनी पाेलीसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार ओवेज, कैफ (वय-१८,रा.काेंढवा) यांच्यासह दाेन १४ वर्षीय अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. संबंधित मुले ही काेंढव्यातील एका शाळेत आठवी इयत्तेत शिक्षण घेत आहे.
२७ मार्च राेजी दकाळी साडेअकरा वाजण्याचे सुमारास सुमीत हा वर्गाचा माॅनीटर असल्याने त्याने शाळेच्या वर्गातील दाेन मुलांना सर्वांसमाेर तुम्ही हेअर कटिंग करुन का आले नाही अशी विचारणा केली. या गाेष्टीचा राग येऊन सदर मुलांनी सुमीत यास शिवीगाळ करुन दम दिला. त्यानंतर इतर दाेन मित्रांसमवेत सुमीत याला लाकडी बांबुने व कमरच्या पट्टयाने उजवे हातावर, डावे पायावर व पाठीवर मारहाण करुन जखमी केले आहे. याबाबत पुढील तपास काेंढवा पाेलीस करत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App