गोव्यात पेट्रोल १२ रुपये तर डिझेल १७ रुपयांनी स्वस्त; वॅट करात कपात केल्यामुळे झाले स्वस्त

वृत्तसंस्था

पणजी : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे पाच आणि दहा रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यांनीही त्यांच्या वॅट करात कपात करण्याचे आवाहन केंद्राने केले होते. त्याला प्रतिसाद देत गोव्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अतिरिक्त सात रुपयांची कपात केली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हा निर्णय जाहीर केला.  In Goa, petrol is cheaper by Rs 12 and diesel by Rs 17; The reduction in VAT has made it cheaper



गोवा सरकारच्या या निर्णयामुळे गोव्यात आता पेट्रोल १२ रुपयाने आणि डिझेल १७ रुपयांनी स्वस्त झालं आहे. इंधनाचे दरात कपात करुन पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेला दिवाळी भेट दिल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी संदेशात म्हटलं आहे. त्यामुळे सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत गोवा सरकार पेट्रोलच्या दरात अतिरिक्त सात रुपये आणि डिझेलच्या दरात अतिरिक्त सात रुपये कपात करत असल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केलं.

In Goa, petrol is cheaper by Rs 12 and diesel by Rs 17; The reduction in VAT has made it cheaper

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात