महाराष्ट्रातही आता इतर राज्यांप्रमाणे इम्पोर्टेड स्कॉच आणि व्हिस्की स्वस्तात मिळणार आहे.In Znanoba, Tukoba’s Maharashtra now decisions are made for addicts; Tushar Bhosale criticizes the government
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने सर्व बाजारपेठा आता खुल्या झाल्या आहेत.दरम्यान आता राज्य सरकारने परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या मद्यवरील उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे महाराष्ट्रातही आता इतर राज्यांप्रमाणे इम्पोर्टेड स्कॉच आणि व्हिस्की स्वस्तात मिळणार आहे.
ठाकरे सरकारच्या या निर्णयावरुन भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी महाविकास आघाडीला मद्य विकास आघाडी सरकार म्हंटलं आहे.
हे तर मद्य विकास आघाडीचे सरकार ! ज्ञानोबा-तुकोबांच्या महाराष्ट्रात फक्त आता व्यसनी लोकांसाठीच निर्णय घेतले जात आहेत.एकीकडे शेतकर्यांचे हाल ,एस.टी कर्मचारी संपावर ,पेट्रोल-डिझेल ला कोणतीही सवलत नाही पण दारूला मात्र विशेष सवलत सातत्याने दिली जातेय.@Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/UN8yhjNAgZ — Acharya Tushar Bhosale (Modi Ka Parivar) (@AcharyaBhosale) November 21, 2021
हे तर मद्य विकास आघाडीचे सरकार !
ज्ञानोबा-तुकोबांच्या महाराष्ट्रात फक्त आता व्यसनी लोकांसाठीच निर्णय घेतले जात आहेत.एकीकडे शेतकर्यांचे हाल ,एस.टी कर्मचारी संपावर ,पेट्रोल-डिझेल ला कोणतीही सवलत नाही पण दारूला मात्र विशेष सवलत सातत्याने दिली जातेय.@Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/UN8yhjNAgZ
— Acharya Tushar Bhosale (Modi Ka Parivar) (@AcharyaBhosale) November 21, 2021
तुषार भोसले म्हणाले की , ज्ञानोबा, तुकोबांच्या महाराष्ट्रात फक्त आता व्यसनी लोकांसाठी निर्णय घेतले जातात. पाहिलं तर एकीकडे शेतकऱ्यांचे खूप हाल होत आहेत व एसटी कर्मचारी संपावर आहेत. तसेच पेट्रोल-डिझेलला कोणती सवलत नाही आणि दुसरीकडे सरकारने मात्र दारुला विशेष सवलत दिली आहे. हे महाविकास आघाडीचं नाही तर मद्य विकास आघाडीचं सरकार आहे हे सिद्ध झालं आहे, असं तुषार भोसले म्हणाले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App