काल पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात कोरोना आढावा बैठक पार पडली.Important news for Punekars: Ajit Pawar’s announcement that Pune Unlock, Corona rules will be relaxed
विशेष प्रतिनिधी
पुणे : कोरोनाने जगभरात चांगलाच हाहाकार माजवला होता. परंतु काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये घट होताना दिसत आहे. त्यामुळे आता सगळीकडे पाहिल्यासारखं वातावरण असेल. यातच आता पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे.
पुण्यामध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळणार आहे. काल पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात कोरोना आढावा बैठक पार पडली. यामध्ये त्यांनी सोमवारपासून पुणे अनलाॅक होणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे.
१)आजपासून पुण्यातील सर्व दुकाने सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरु राहणार आहेत. २) शहरातील हॉटेल्स रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली. ३) विकेंड म्हणजे शनिवारी आणि रविवारी या सर्व गोष्टींना दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. ५) पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील खासगी कार्यालये 100 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. ६) त्याचबरोबर पर्यटन स्थळे खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App