• Download App
    ऋतिक रोशनचे आर्यन खानला तात्त्विक उपदेशाचे खुले पत्र; कंगना म्हणाली, सगळे "माफिया पप्पू" त्याच्या भोवती उभे राहिलेत!! |Hrithik Roshan's open letter of philosophical advice to Aryan Khan; Kangana said, all the "Mafia Pappu" stood around him

    ऋतिक रोशनचे आर्यन खानला तात्त्विक उपदेशाचे खुले पत्र; कंगना म्हणाली, सगळे “माफिया पप्पू” त्याच्या भोवती उभे राहिलेत!!

    वृत्तसंस्था

    मुंबई : मुंबई – गोवा क्रूजवरील ड्रग्स रेव्ह पार्टीमध्ये सामील झालेल्या आर्यन खानला अटक झाल्यानंतर अनेक बॉलिवूड कलाकार त्याच्या पाठीशी उभे राहिले आहेत. यामध्येच आता ऋतिक रोशनहीचा समावेश झाला आहे.Hrithik Roshan’s open letter of philosophical advice to Aryan Khan; Kangana said, all the “Mafia Pappu” stood around him

    ऋतिक रोशनने आर्यन खान याच्या नावाने तात्विक उपदेश करणारे एक पत्र इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. “डियर आर्यन, तू या आगीत तप्त होऊन तावून-सुलाखून बाहेर ये. जीवन असेच असते, ते कधी आनंद देते तर कधी दुःख देते…!! आपण पुढे चालत राहायचे असते. चुकांमधून शिकायचे असते. चुका करणे म्हणजे गुन्हा नव्हे…!!, असा उपदेश ऋतिक रोशनने या खुल्या पत्रात आर्यन खाल्ला केला आहे.



    हे पत्र त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करतात अभिनेत्री कंगना राणावत हिने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सगळे “माफिया पप्पू” आता आर्यन खानच्या पाठीशी उभे राहायला पुढे आले आहेत, अशा शब्दांत तिने आपला संताप व्यक्त केला आहे.

    आर्यन खानने कोणते देशभक्तीचे कृत्य केलेले नाही. तो ङ्रग्ज रेव्ह पार्टीमध्ये सामील झालेला असताना सापडला आहे. त्याच्याविरोधात भारतीय कायद्यानुसार कारवाई सुरू आहे. तो दोषी असेल तर त्याला शिक्षा होईलच, अशा शब्दात कंगना राणावत हिने आर्यन खान विषयी सहानुभूती दाखवणार्या बॉलिवूडच्या तारे-तारकांना खडसावले आहे.

    आर्यन खान याला अटक झाल्यानंतर सलमान खान तसेच कविता कृष्णमूर्ती यांच्यासह अनेक बॉलिवूडचे कलाकार शाहरूख आणि गौरी खानच्या भेटीसाठी मन्नतवर पोहोचले होते. जणू काही आर्यन खानला पकडून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कोणता गुन्हाच केला आहे, असा आव त्यांनी आणला होता. या पार्श्वभूमीवर कंगना राणावत हिने आर्यन खान याच्या पाठीशी उभे राहणार्‍या बॉलिवुडच्या कलाकारांना खडसावले आहे.

    Hrithik Roshan’s open letter of philosophical advice to Aryan Khan; Kangana said, all the “Mafia Pappu” stood around him

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या फाईलींचे कपाट तुम्हीच मोदी साहेबांना उघडायला सांगा; अजितदादा गटाचा पवारांना टोला!!

    पुरोगामी महाराष्ट्राच्या नुसत्याच तोंडी वाफा; दुसऱ्या टप्प्यात मतदारांनी घरात काढल्या झोपा!!; वाचा मतदानाचा आकडा!!

    435 कोटी थकबाकीच्या कारखान्याच्या गोडाऊनला बँकेने ठोकले सील; पवार समर्थकांनी त्याचा संबंध जोडला पवारांच्या सभेशी!!