• Download App
    Heavy rainfall forecast for Mumbai, Konkan, and Central Maharashtra मुंबई कोकण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज; आपत्कालीन परिस्थितीसाठी हेल्पलाइन नंबर जारी!!

    मुंबई कोकण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज; आपत्कालीन परिस्थितीसाठी हेल्पलाइन नंबर जारी!!

    Mumbai

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : 4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून सरकारने हेल्पलाइन नंबर जाहीर केले आहेत.Heavy rainfall forecast for Mumbai, Konkan, and Central Maharashtra

    मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 4 ते 6 जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच, मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत स्थानिक प्रवासात अडथळे आणि काही प्रमाणात संरचनात्मक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.



    नागरिकांनी या काळात सतर्क राहावे. विशेषतः सखल भागांमध्ये आणि घाट रस्त्यांवर प्रवास करताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येत आहे.

    – मुंबई महापालिका हेल्पलाईन क्रमांक : 1916

    – पालघर हेल्पलाईन क्रमांक – 02525 297474, +91 82379 78873

    – ठाणे महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक : 022-25364779, 0222530 1740, 91 93723 38827

    – ठाणे, आपत्ती व्यवस्थापन कक्ष : 1800-222-108/8657887101

    – पनवेल महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक : 02227458040/41/42

    Heavy rainfall forecast for Mumbai, Konkan, and Central Maharashtra; helpline numbers issued for emergencies!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पुणे जिल्ह्यातील चांडोली खुर्दच्या शेतात फुलला ‘तुर्किस्तान बाजरा’चा ऐतिहासिक वारसा

    Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण; सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, नार्कोटेस्टबाबत कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

    Bandu Jadhav on Uddhav Thackeray: ‘उद्धवसाहेब, तुम्ही नाही तर आदित्य ठाकरेंना तरी महाराष्ट्रभर फिरवा असं सांगितलं होतं’; बंडू जाधवांचा मोठा दावा