• Download App
    Mamata’s and Pawar’s parties into the Congress, but why hasn't any action been taken yet? ममता आणि पवारांचे पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या नुसत्या चर्चा; पण अजून कार्यवाही का होई ना??

    ममता आणि पवारांचे पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या नुसत्या चर्चा; पण अजून कार्यवाही का होई ना??

    mamta and pawar

    नाशिक : ममता आणि पवारांचे पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या नुसत्याच चर्चा पण अजून कार्यवाही का होई ना??, असा सवाल काही राजकीय हालचालींमुळे आणि त्या संबंधांमधल्या बातम्यांमुळे समोर आला.Mamata’s and Pawar’s parties into the Congress, but why hasn’t any action been taken yet?

    ममता बॅनर्जींची तृणमूळ काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष मूळचे काँग्रेस मधलेच असल्याने या दोन्ही पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावे, अशा सूचना काही काँग्रेसच्या नेत्यांनी केल्या. यामध्ये दोन माजी मुख्यमंत्र्यांचाही समावेश राहिला. अशोक गेहलोत आणि पृथ्वीराज चव्हाण ही त्यांची नावे. या दोघांनीही ज्यांच्या नावात काँग्रेस आहे त्या पक्षांनी मूळ काँग्रेसमध्ये विलीन व्हावे, अशी सूचना केली. त्यामुळे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या नंतर रंगलेली चर्चा आणि मध्येच थांबलेली चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली



    – political liabilities

    पण मूळात ज्या ममता बॅनर्जींची आणि शरद पवारांची राजकीय राजकीय किंमत घटली आहे किंबहुना ज्यांच्या पक्षांची राजकीय अस्तित्वासाठी धडपड चालू आहे, अशा दोन पक्षांना मूळ काँग्रेस पक्ष स्वतःमध्ये विलीन करून घेईलच का?? आणि घ्यावेतच का??, हे खरे दोन सवाल आहेत. कारण आज ममता बॅनर्जी आणि शरद पवार हे दोन नेते काही political assets
    उरलेले नाहीत. उलट ते political liability बनले आहेत. अशा स्थितीत या दोन्ही नेत्यांच्या पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन करून घेणे म्हणजे त्या पक्षांच्या political liabilities आपल्यावर ओढवून घेण्यासारखेच आहे. त्यामुळे कदाचित ममता आणि पवारांच्या पक्षांच्या विलीनीकरणाला अजून तरी काँग्रेस श्रेष्ठी हिरवा कंदील दाखवत नसावेत.

    – ममता आणि पवार यांच्यात फरक

    शिवाय ममता आणि पवार या दोन नेत्यांच्या राजकीय वर्तणुकीत एवढा मूलभूत फरक आहे, की त्यांना एकाच राजकीय तागडीत तोलणे देखील अवघड आहे. ममता बॅनर्जींनी मूळ काँग्रेस पासून फारकत घेऊन त्यांचा तृणमूळ काँग्रेस पक्ष काढला त्यामागे त्यांचा सोनिया गांधींवर किंवा गांधी परिवारावर कुठला आक्षेप नव्हता, तर त्यांना फक्त पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसमध्ये राहून काम करण्याचे स्वातंत्र्य हवे होते. ममतांना तिथे काँग्रेसच्या रूपाने कम्युनिस्टांच्या आघाडीला भक्कम पर्याय उभा करायचा होता. कम्युनिस्ट राजवटीला हरवायचे होते, पण त्यावेळी गांधी परिवार आणि काँग्रेसची political priority वेगळी होती. काँग्रेस त्यावेळी कम्युनिस्टांच्या आघाडीवर राजकीय दृष्ट्या अवलंबून होती. त्यामुळे सोनिया गांधी ममता बॅनर्जींना अपेक्षित असे राजकीय स्वातंत्र्य देऊ शकल्या नाहीत म्हणून ममता बॅनर्जी काँग्रेस पासून फारकत घेऊन बाजूला झाल्या आणि त्यांनी तृणमूळ काँग्रेस काढली. त्याच तृणमूळ काँग्रेसने कम्युनिस्टांचा सलग तीन वेळा पराभव करून पश्चिम बंगाल वर राज्य केले आणि चौथ्या निवडणुकीत ममता बॅनर्जी हरल्यात म्हणून त्यांच्या तृणमूळ काँग्रेसच्या मूळ काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली. ममता बॅनर्जी निवडणूक हरल्या नसत्या, तर असली विलीनीकरणाची चर्चाच घडून येऊ शकली नसती.

    – पवारांचा सोनियांना वैयक्तिक विरोध

    पण जे ममता बॅनर्जींचे आहे, तसे शरद पवारांचे नाही. शरद पवारांनी स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी सोनिया गांधींना वैयक्तिक पातळीवर विरोध केला. परकीयत्वाचा मुद्दा काढून त्यांच्या पंतप्रधान पदाच्या महत्त्वाकांक्षेत खोडा घातला. त्यामुळे सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसने शरद पवारांना पक्षातून काढून टाकले म्हणून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस नावाची स्वतंत्र चुल मांडावी लागली. पण ती चूल आता विझत आल्याने त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मूळ काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची चर्चा किंवा चर्चेची पुडी पवारांच्या गोटातल्या नेत्यांना राजकीय हवेत सोडावी लागली.

    – पवारांची राजकीय मजबुरी

    पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी मी जसे कर्तृत्व दाखविले, तसे कर्तृत्व महाराष्ट्रात पवार दाखवू शकले नाहीत. ते महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची स्वतंत्रपणे सत्ता आणू शकले नाहीत. त्यांना आपल्या मुलीचे किंवा आपल्या समर्थकांचे राजकीय बस्तान व्यवस्थित बसवता आले नाही. त्यामुळे आपल्या मुलीचे राजकीय बस्तान बसविण्यासाठी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस मूळ काँग्रेसमध्ये विलीन करावीशी वाटली. पण त्याआधी अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर त्यांनी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस कब्जात घेण्याचाही प्रयत्न करून झाला, पण भाजप आणि सुनेत्रा पवार यांनी तो डाव उधळून लावला. म्हणून मग पवारांना पुन्हा काँग्रेसची वाट धरावीशी वाटली. अन्यथा पवारांना काँग्रेसचे फार मोठे प्रेम आहेत म्हणून ते काही विलीनीकरण करायच्या मागे लागलेले नाहीत.

    – सोनिया दोन्ही नेत्यांना पुरते ओळखून…

    पण आता ममता काय किंवा पवार काय हे दोघेही काँग्रेससाठी political assets राहिलेले नाहीत ते political liabilities बनलेले आहेत ममतांच्या पक्षाच्या नेत्यांना पश्चिम बंगाल मध्ये अंडी खावी लागताहेत. पवारांच्या नेत्यांवर महाराष्ट्रात अजून तशी वेळ आलेली नाही. पण पवारांनीच “संस्कार” केल्याप्रमाणे त्यांचे नेते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत आणि खऱ्या अर्थाने सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध संघर्ष सुद्धा करू शकत नाहीत. त्यामुळे पवारांची गोची झाली आहे. सोनिया गांधींसारख्या चाणाक्ष नेत्याला ममता आणि पवार यांचे राजकीय उपद्रव मूल्य माहिती आहे. त्यांची सध्याची राजकीय गोची सुद्धा लक्षात आली आहे. म्हणूनच त्या कदाचित दोन्ही नेत्यांना त्यांचे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यासाठी अजून हिरवा कंदील दाखवत नसतील. पण ममता आणि पवार यांची राजकीय किंमत आणखी घसरली, त्यांच्या पक्षांची अवस्था आणखी गलितगात्र झाली, की मग कदाचित सोनिया गांधी काँग्रेसच्या राजकीय हिशेबानुसार या दोन्ही नेत्यांना त्यांचे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यास हिरवा कंदील दाखवतील. ममता आणि पवारांच्या राजकीय सोयी लावण्यासाठी ते विलीनीकरण नसेल, तर काँग्रेसच्या राजकीय फायद्यासाठी किंवा या दोन्ही नेत्यांच्या पक्षांचा फटका काँग्रेसला बसू नये एवढ्यासाठी ते विलीनीकरण असेल. अन्यथा सोनिया गांधी ममता आणि पवार या दोन्ही नेत्यांना हाताचे अंतर राखूनच काँग्रेसच्या जवळ घेतील!!

    Mamata’s and Pawar’s parties into the Congress, but why hasn’t any action been taken yet?

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gulf of Aden : भारतीय नौदलाने समुद्री चाच्यांचा हल्ला हाणून पाडला; एडनच्या आखातात आयएनएस त्रिकंडच्या मार्कोस कमांडोना पाहताच दरोडेखोर पळून गेले

    Supreme Court : सुप्रीम कोर्ट म्हणाले- निर्णयांमधील AI ची खोटी उदाहरणे धोकादायक; हे मिथाइल आयसोसायनेटसारखे, यामुळे न्यायव्यवस्थेचे नुकसान

    राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणात संघाची भूमिका कठोर; पण हिंदू विरोधी षडयंत्राकडेही बोट!!