• Download App
    he Pawar family's ambitions have soared; BJP and Congress have shown the mirror!! पवार कुटुंबाची उफाळली महत्त्वाकांक्षा; भाजप आणि काँग्रेसने दाखविला आरसा!!

    पवार कुटुंबाची उफाळली महत्त्वाकांक्षा; भाजप आणि काँग्रेसने दाखविला आरसा!!

    Pawar family

    नाशिक :  पवार कुटुंबाची उफाळली महत्त्वाकांक्षा; भाजप आणि काँग्रेसने दाखविला आरसा!!, हे राजकीय वास्तव कालच जय पवारच्या वक्तव्यानंतर समोर आले.he Pawar family’s ambitions have soared; BJP and Congress have shown the mirror!!

    सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होऊन फक्त तीनच महिने पूर्ण झालेत, तरी सुद्धा जय पवारांची आईच्या मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा उफाळून आली. त्यांनी ती स्वतःच्या तोंडून जाहीर देखील केली. पण त्यामुळेच भाजपच्या नेत्यांना आणि काँग्रेसच्या नेत्यांना पवार कुटुंबाला राजकीय आरसा दाखवून द्यायची संधी मिळाली.

    – पोस्टरवरच्या मुख्यमंत्री

    जय पवारच्या तोंडून सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री करायची महत्त्वाकांक्षा उफाळून येताच बारामतीकरांच्या उत्साहाला उधाण आले. त्यांनी लगेच सुनेत्रा पवारांचे नाव महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून पोस्टरवर लावले.



    – बहुमताच्या वास्तवाचा आरसा

    पण म्हणून लगेच सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्या, असे अजिबात घडले नाही. उलट भाजपच्या नेत्यांनी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी पवार कुटुंबीयांच्या राजकीय जखमेवर मीठ चोळले. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी पवार कुटुंबीयांना कधीच कुठला बहुमताचा आकडा गाठता आला नाही, हे वास्तव दाखवून दिले.

    – भाजपचा टोला

    जय पवारांनी आईच्या मुख्यमंत्री पदाची अपेक्षा केली यात गैर काही नाही. पण मुख्यमंत्री व्हायला संख्याबळ लागते. ते राष्ट्रवादी काँग्रेस कडे नाही, असा टोला भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी हाणला. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी दरेकर यांचाच मुद्दा उचलून धरला. भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी तर सुनेत्रा पवारांच्या मुख्यमंत्री पदाचा मुद्दा पुरता हाणून पाडला. २०२९ मध्ये देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असे त्यांनी जाहीरपणे सांगितले.

    – काँग्रेसचा टोमणा

    पण त्यावर कडी काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केली. भाजप बरोबर राहून सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होणार नाहीत. भाजप दुसऱ्या पक्षांच्या मुख्यमंत्र्यांचे काय करतो??, हे तुम्ही एकनाथ शिंदे आणि नितीश कुमार यांना विचारा, असा टोमणा सचिन सावंत यांनी जय पवार यांना हाणला. या एकाच टोमण्यातून त्यांनी भाजप, शिंदे सेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला डिवचून घेतले.

    – पवारांचे राजकीय कर्तृत्व तोकडे

    सगळ्याच पवारांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा नेहमी फारच उफाळून आल्या. पण सगळ्याच पवारांचे राजकीय कर्तृत्व फारच तोकडे ठरले. शरद पवारांना पंतप्रधान पदाची महत्त्वाकांक्षा होती, पण त्यांना कधी नऊ पेक्षा जास्त खासदार निवडून आणता आले नाहीत. त्यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक सुद्धा जिंकता आली नाही. अखंड राष्ट्रवादी काँग्रेसला कधीच 71 पेक्षा जास्त आमदार निवडून आणता आले नाहीत, तरीसुद्धा अजित पवार यांच्या मनात मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा कायम राहिली. शरद पवारांना तर सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री करण्याची महत्त्वाकांक्षा होती. पण राजकीय कर्तृत्वाअभावी ती कधीच पूर्ण होऊ शकली नाही.

    अजित पवार आणि शरद पवार वेगवेगळे झाल्यानंतर अजित पवारांना भाजपच्या साथीने फक्त एक खासदार आणि 41 आमदार आणता आले. शरद पवारांना भाजपच्या विरोधात आठ खासदार आणि दहा आमदार निवडून आणता आले. म्हणजेच कुठल्याच पवारांची सिंगल आणि डबल डिजिटच्या पलीकडे कधी मजलच गेली नाही. पण म्हणून त्यांच्या महत्त्वाकांक्षांना धुमारे फुटायचे राहिले नाहीत. तसे धुमारे फुटले म्हणूनच सगळ्याच पवारांना शेवटी कार्यकर्त्यांनीच “भावी मुख्यमंत्री” पोस्टर वर चढविले. त्यावरच पवार कुटुंबाला समाधान मानावे लागले.

    he Pawar family’s ambitions have soared; BJP and Congress have shown the mirror!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मुलाने आईच्या नावाची रिंग टाकली; आत्याबाईंची दांडी गुल केली!!

    Nashik Corporate : कॉर्पोरेट जिहाद, निदा खानला संभाजीनगरातून अटक; 27 दिवसांपासून फरार निदा नारेगावच्या कैसर कॉलनीत लपली होती

    जंग जंग पछाडले, पद काही मिळेना; पण स्वतःच्या तोंडून महत्त्वाकांक्षा जाहीर करायची हौस काही फिटेना!!