हवाला ऑपरेटर उदय शंकर महावार : सोनिया गांधी – ठाकरे कनेक्शन व्हाया यशवंत जाधव; किरीट सोमय्यांचा स्फोटक आरोप!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे छापे सुरू असताना भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नॅशनल हिरडी मध्ये हेराल्ड मध्ये मनी लॉन्ड्रिंग करणाऱ्या हवाला ऑपरेटर उदय शंकर महावार याचाच यशवंत जाधव यांच्याशी संबंध आहे. म्हणजे सोनिया गांधी – उद्धव ठाकरे यांचे कनेक्शन व्हाया यशवंत जाधव असा हा संबंध आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. Hawala operator Uday Shankar Mahawar: Sonia Gandhi – Thackeray connection via Yashwant Jadhav; Explosive allegations of Kirit Somaiya !!

ज्या हवाला ऑपरेटर उदय शंकर महावारने नॅशनल हेराल्ड मध्ये मनी लॉन्ड्रिंग केले, ते रेकॉर्ड वर उपलब्ध आहे. त्या महावारनेच यशवंत जाधव यांच्याकडून 15 कोटी रूपयांची कॅश घेऊन त्यांना त्या बदल्यात चेक दिले. त्यातला काही पैसा परदेशात पाठवण्यात आला हा मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार इन्कम टॅक्सच्या डोळ्यावर आला आणि त्याचा तपास सुरू आहे. या प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या देखील पुढे येणार आहे, असे किरीट सोमय्या म्हणाले.



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावरच्या 19 बंगल्यांबाबतची जनहित याचिका लवकरच मुंबई हायकोर्टात दाखल करणार असल्याचे देखील किरीट सोमय्या म्हणाले. त्यांनी उद्धव ठाकरे यांना 19 बंगल्यांच्या प्रकरणावर स्वतः बोलण्याचे आवाहन केले. आपल्या ऐवजी कायम संजय राऊत यांना पुढे करू नये, असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला.

Hawala operator Uday Shankar Mahawar: Sonia Gandhi – Thackeray connection via Yashwant Jadhav; Explosive allegations of Kirit Somaiya !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात