• Download App
    तमाशा कलावंतांसाठी आनंदाची बातमी, येत्या 1 फेब्रुवारीपासून तमाशाच्या फडांना मुभा । Good News for Tamasha Artists , Permission for spectacle release from 1st February

    तमाशा कलावंतांसाठी आनंदाची बातमी, येत्या 1 फेब्रुवारीपासून तमाशाच्या फडांना मुभा

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीत कलावंतांना आश्वासन मिळालेलं आहे. Good News for Tamasha Artists , Permission for spectacle release from 1st February


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : राज्यातील तमाशा कलावंतांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या 1 फेब्रुवारीपासून तमाशाच्या फडांना मुभा मिळणार आहे.20 जानेवारीला तमाशा पंढरी नारायणगावमधून अजित पवारांच्या बंगल्यासमोर आत्मदहन करणार,असा इशारा तमाशा फड मालकांनी दिला होता.

    दरम्यान राज्य सरकारने या इशाऱ्याला गांभीर्याने घेत आज बैठक ठेवली. त्यात येत्या 1 फेब्रुवारी पासून तमाशाला मुभा देण्यात येईल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीत कलावंतांना आश्वासन मिळालेलं आहे.



    अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडेकर यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.तमाशा सारखी ही कला, वारसा या संकटात लुप्त होऊन द्यायचा नसेल तर या कलेला पुन्हा उभे करण्यासाठी आर्थिक आधार देणे गरजेचे आहे.

    Good News for Tamasha Artists , Permission for spectacle release from 1st February

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Palghar Highway Accident : ट्रक – कंटेनरच्या टक्करमध्ये 13 ठार; पालघर जिल्ह्यात साखरपुड्याला जाणाऱ्या वऱ्हाड्यांचा मृत्यू; 25 गंभीर, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना

    Sunetra Pawar : NCPचे सर्व आमदार सुनेत्रा पवारांच्या पाठीशी; आमदार शेळकेंची स्पष्टोक्ती; रोहित पवारांकडे भाजपत जाणाऱ्या 40 लोकांची नावे – लोंढे

    NEET Paper Leak : NEET पेपरलीकप्रकरणी RCC क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी, 10 दिवस आधीच मिळवला होता पेपर