विशेष प्रतिनिधी
मुंबई : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार थकीत असलेला फरक लवकरच मिळणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 40 % हिस्स्यानुसार 56.10 कोटी रुपये त्वरित महामंडळाला दिली जाणार आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. महापालिका हिस्स्याची थकीत रक्कम ‘पीएमपीएमएल’कडे वितरीत करण्यात येणार आहे. भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्ट वरून ही माहिती दिली.“Good news” for PMPML employees; Seventh Pay Commission dues will be received soon!!
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्री. शेखर सिंह यांच्यासह चर्चा करून पहिल्या फरकाच्या हप्त्याचे वितरण सुनिश्चित केले होते. त्यानंतर दुसऱ्या हप्त्यासाठी आयुक्त श्री. श्रावण हार्डीकर यांना सातत्याने सूचना देऊन रक्कम लवकर काढण्याचे प्रयत्न केले.
संबंधित बैठकीत पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त, कामगार संघटना पदाधिकारी आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग होता. तसेच, ‘पीएमपीएमएल’ कर्मचाऱ्यांच्या वतीने श्री. रवींद्र लांडगे, श्री. संतोष काळजे, श्री. दिनकर काळजे आणि श्री. उमेश धावडे यांनी सातत्त्याने पाठपुरावा केला आहे.
“दुसऱ्या हप्त्याबरोबरच उर्वरित दोन हप्तेसुद्धा लवकर वितरीत केले जातील. कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम योग्य वेळी मिळावी. हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या हितासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. महामंडळाकडून 2025-26 च्या अंदाजपत्रकात आर्थिक तूट लक्षात घेऊन पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका स्वतःच्या उत्पन्नातून फरक भरून देणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी चिंता करण्याचे कारण नाही. पीएमपीएमएलची सेवा अधिक सक्षम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना आता प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App