विशेष प्रतिनिधी
नाशिक : श्रावणमासाच्या पावन संध्याकाळी गोदावरी सेवा समिती, नाशिक यांच्या वतीने उद्या १ ऑगस्ट २०२५, शुक्रवार, सायंकाळी ६ वाजता रामकुंड गोदावरी तीरावर गोदावरी महाआरती संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम धार्मिक विधी बरोबरच सामाजिक समरसता, श्रद्धा आणि राष्ट्रभावनेचा सांस्कृतिक संगम देखील ठरणार आहे. Godavari Maha Aarti
या महाआरती मध्ये सिख पंथातील मान्यवर संत आणि धर्मप्रेमी नागरिकांचा सन्माननीय सहभाग लाभणार असून, महाआरतीला उपस्थित राहणारे प्रमुख अतिथी पुढीलप्रमाणे आहेत.
चुकार मंत्र्यांना झापले की नाही??, फडणवीस म्हणाले, मंत्रिमंडळात जे बोललो, ते बाहेर सांगणार नाही!!
कार्यक्रमाअंतर्गत सिख परंपरेतील दसगुरूंचं सामूहिक पूजन, भावगीतांमधून राष्ट्रभक्तीची ध्वजा उंचावणारी कीर्तनमयी संध्या आणि नंतर विधिवत महाआरती होईल.
गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष श्री. जयंत गायधनी, सचिव श्री. मुकुंद खोचे आणि विश्वस्त रणजीतसिंग आनंद यांनी सर्व नाशिककरांना या कार्यक्रमात सहपरिवार सहभागी होण्याचे सादर आवाहन केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App