• Download App
    Fuel saving means fuel production: ST's statewide campaign for diesel saving; Saving 1000 liters of diesel every day!!इंधनाची बचत म्हणजेच इंधनाची निर्मिती : ST ची डिझेल बचतीसाठी राज्यव्यापी मोहीम; दररोज १००० लिटर डिझेलची बचत!!

    इंधनाची बचत म्हणजेच इंधनाची निर्मिती : ST ची डिझेल बचतीसाठी राज्यव्यापी मोहीम; दररोज १००० लिटर डिझेलची बचत!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘इंधन बचत… म्हणजेच इंधन निर्मिती’ ही व्यापक संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी
    आज मंत्रालयात महत्त्वाची बैठक घेतली.Fuel saving means fuel production: ST’s statewide campaign for diesel saving; Saving 1000 liters of diesel every day!!

    – दररोज १ लाख रुपयांपर्यंतची बचत

    एसटी महामंडळाला सध्या दररोज सरासरी १०.८७ लाख लिटर डिझेलची आवश्यकता भासत असून, इंधन खर्च कमी करणे ही काळाची गरज आहे. एसटीच्या प्रत्येक आगाराने दररोज किमान ५ लिटर डिझेल बचतीचे उद्दिष्ट निश्चित केले, तरी संपूर्ण राज्यभरातून दररोज किमान १००० लिटर डिझेलची बचत होऊ शकते. सध्याच्या डिझेल दरानुसार ही बचत दररोज जवळपास १ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. लहान बचतीतून मोठी आर्थिक नशिस्त निर्माण होते आणि हीच बचत भविष्यात एसटीसाठी मोठी ताकद ठरू शकते.



    – प्रत्येक आगाराचे उद्दिष्ट

    या पार्श्वभूमीवर सर्व विभाग नियंत्रक आणि आगार व्यवस्थापकांना तातडीने आगारनिहाय डिझेल बचतीची उद्दिष्टे निश्चित करण्याचे निर्देश दिले. प्रत्येक आगाराने आपल्या बसगाड्यांच्या इंधन वापराचे नियमित विश्लेषण करून बचतीसाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, असे आदेशही दिले.

    – डिझेल बचतीसाठी प्रोत्साहन

    डिझेल बचतीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या चालकांचा विशेष सत्कार करण्यात येईल तसेच त्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्याची योजनाही सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय ज्या आगारांनी निश्चित उद्दिष्टांपेक्षा अधिक डिझेल बचत केली असेल, त्या आगारांना दरमहा विशेष पुरस्कार आणि आर्थिक प्रोत्साहन देण्यात येईल. यामुळे आगारांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण होऊन बचतीची चळवळ अधिक प्रभावी होईल, असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केला.

    – तांत्रिक सुधारणेवर तातडीने भर

    इंधन बचतीसाठी वेग नियंत्रण, योग्य गिअरचा वापर, अनावश्यक इंजिन सुरू ठेवणे टाळणे, ब्रेकिंग पद्धतीत सुधारणा यांसारख्या बाबींवर विशेष प्रशिक्षण दिले जाईल. तसेच बसेसची दैनंदिन तांत्रिक तपासणी, वेळेवर दुरुस्ती आणि इंजिन कार्यक्षमतेची नियमित पाहणी यावर भर देण्याचे निर्देशही दिले.

    Fuel saving means fuel production: ST’s statewide campaign for diesel saving; Saving 1000 liters of diesel every day!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    बारक्या पक्षांना गिळून एकनाथ शिंदेंची दमदार वाटचाल; पण पवार संस्कारितांचा सत्तेत आणि विरोधात दोन्हीकडे धडपडाट!!

    शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    Rupali Ganguly : ध्रुव राठीवर संतापली अनुपमा फेम अभिनेत्री; म्हटले – देशाला परदेशात बसलेल्या यूट्यूबरची गरज नाही