विशेष प्रतिनिधी
मुंबई : संगीता पोळ- जाधव यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अप्रतिम पोर्टेट काढले आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी सुद्धा जाधव यांच्या कलेचे कौतुक केले तसेच पोर्टेटवर स्वाक्षरी करून शुभेच्छा संदेश सुद्धा दिला आहे.From Raj Thackeray Appreciation of painti
संगीता पोळ- जाधव यांनी चित्रकलेचे शिक्षण घेतले नसताना देखील त्या सुंदर पोर्टेट काढतात. त्या राज ठाकरे यांच्या चाहत्या आहेत. गेली १५ वर्षे त्या राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मनसेचे कीर्तीकुमार शिंदे यांच्याकडे आग्रह धरत होत्या.
पण, निमित्त झाले संगीता जाधव यांनी बनविलेल्या राज ठाकरे यांच्या पोर्टेटचे.शिवतीर्थ या निवसस्थानी राज ठाकरे यांची भेट त्यांनी घेतली. त्यावेळी राज ठाकरे यांनी पोर्टेटवर ”सौ. संगीता जाधव, सस्नेह जय महाराष्ट्र! शुभेच्छा!”, असा संदेश लिहून स्वाक्षरी देखील केली. त्यामुळे संगीत जाधव भारावून गेल्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App