दीपक सावंत ठाकरे गटावर नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती.
प्रतिनिधी
मुंबई : उद्धव ठाकरेंना शिंदे गटाकडून यांच्याकडून राजकीय धक्के बसणे अद्याप सुरूच आहेत. आता ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे दीपक सावंत हे उद्ध ठाकरेंचे निकवटर्तीय म्हणून ओळखले जातात. आता त्यांनी पक्ष सोडल्याने ठाकरे गटाला भगदाड पडू शकते, असे बोलले जात आहे. Former minister Dr Deepak Sawant from the Uddhav Thackeray faction joins CM Eknath Shindes Shiv Sena
यह एक चिराग कई आँधीयों पे भारी है!!; देवेंद्र फडणवीसांचा टोला धनंजय मुंडेंना, पण निशाणा पवारांवर!!
‘मी डॉ. दीपक सावंत यांचे शिवसेना पक्षात स्वागत करतो. त्यांच्या अनुभवाचा आम्हाला फायदा होईल.” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. दीपक सावंत हे शिंदे गटाचं मुख्यालय असणाऱ्या बाळासाहेब भवनमध्ये दाखल झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत दीपक सावंत यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे. दीपक सावंत ठाकरे गटावर नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. याच नाराजीमुळे उद्धव ठाकरे आणि दीपक सावंत यांच्यात अंतर निर्माण झाल्याचं बोललं जात होतं.
Maharashtra | Former minister Dr Deepak Sawant from the Uddhav Thackeray faction joins CM Eknath Shinde's Shiv Sena pic.twitter.com/kKijhyjhEg — ANI (@ANI) March 15, 2023
Maharashtra | Former minister Dr Deepak Sawant from the Uddhav Thackeray faction joins CM Eknath Shinde's Shiv Sena pic.twitter.com/kKijhyjhEg
— ANI (@ANI) March 15, 2023
नुकतंच ठाकरे गटाचे नेते आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा मुलगा शुभम देसाईने शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला होता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App