वृत्तसंस्था
मुंबई : मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा आता १५ ऑगस्टपासून सुरु होत आहे. त्यासाठी मुंबईतल्या बहुतांश ठिकाणी प्रवाशांची नोंदणी आणि क्यूआर कोड पास देण्यात येत आहेत. For Locals travel pass at various railway stations in Mumbai citizen are coming
लसीचे दोन घेतलेल्या नागरिकांना लोकांना प्रवास करता येणार आहे. याच पार्श्वभूमीवर ११ तारखेपासून अर्थात आजपासून मुंबईतल्या बहुतांश ठिकाणी पास देण्यात येत आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने कल्याण स्थानकात व्हेरिफिकेशन स्टॉल उभारला आहे. काही प्रवाशी मासिक पाससाठी व्हेरिकेशन स्टॉलवर पोचले आहेत.
पास घेणाऱ्या नागरिकांच्या मदतीसाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने प्रत्येक रेल्वे स्थानकावर मदत केंद्र स्थापन केले आहे. दुसरा डोस घेतलेले प्रमाणपत्र, फोटो असलेले मूळ छायांकित ओळखपत्र किंवा छायांकित प्रत घेऊन मदत कक्षावर जाऊन, आपले कागदपत्र तपासून स्टॅम्प मारून घ्यावा लागणार आहे. नंतर तिकीट खिडकीवर त्यांना मासिक पास मिळणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App