स्वबळ वाढवायसाठी फिल्टर न लावता भाजप मध्ये वादग्रस्तांचे पक्षप्रवेश; पण प्रत्यक्ष उमेदवारी देताना चाळणी लागणार का??

नाशिक : महाराष्ट्रात भाजपचे स्वबळ वाढवण्यासाठी फिल्टर न लावता अनेकांना पक्षात प्रवेश देण्यात येतोय, पण महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुकांसाठी उमेदवारी देताना मात्र चाळणी लागणार का??, असा सवाल तयार झालाय. incoming in BJP

महाराष्ट्रात भाजपने 2029 चे स्वबळाचे टार्गेट ठेवले आहे. हे टार्गेट अजिबात नवीन नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीरपणे 2029 मध्ये महाराष्ट्रात भाजप स्वबळावर सत्तेवर येईल अशी घोषणा करून महाराष्ट्रातल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना स्वबळ वाढवायची आधीच असाइन्मेंट देऊन ठेवली आहे. आगामी महापालिका जिल्हा परिषद आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ही या स्वबळाची “सेमी फायनल” आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपचे स्वबळ वाढवण्यासाठी फिल्टर न लावता अन्य पक्षांमध्ये भाजपमध्ये प्रवेश देण्याचा नेत्यांनी सपाटा लावला. नाशिक आणि सांगली त्याचे प्रत्यंतर आले.

वसंतदादांच्या घराण्याच्या हाती कमळ

सांगलीत वसंतदादा पाटलांच्या नातसून आणि माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी वर्षानुवर्षाची हाताच्या पंजाची साथ सोडून कमळ हाती धरायचे ठरविले. त्याआधी त्या हातावर घड्याळ बांधणार होत्या. पण त्यांना घड्याळाची टिकटिक फारशी मानवली नाही आणि हातावर घड्याळ बांधून फारसा लाभ ही मिळणार नाही, याची खात्री झाल्यानंतर जयश्री पाटलांनी अनुभवांती हातात कमळ धरले. सांगलीचे विद्यमान अपक्ष खासदार विशाल पाटील यांचाही सध्याचा सत्ताधारी पक्ष म्हणून भाजपकडेच ओढा आहे. त्यामुळे सत्तेच्या वळचणीला बसून जेवढे लाभ घेता येतील तेवढे घ्यायचे, असा वसंतदादा घराण्याचा होरा आहे. चंद्रकांतदादा पाटलांनी वसंतदादांच्या घराण्याला साथ दिली आहे.



बडगुजर, घोलप भाजपमध्ये

इकडे नाशिक मध्ये तिन्ही स्थानिक आमदारांच्या विरोधाला डावलून सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला. त्यासाठी खास गाड्या आणि बस रवाना करून नाशिक मधल्या बड्या पक्ष प्रवेशाचा मोठा तामझाम करण्यात आला. सुधाकर बडगुजर आणि सलीम कुत्ता यांच्यातले संबंध ठरवून विसरण्यात आले. मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक महापालिकेचे 100 नगरसेवक निवडून आणायचे टार्गेट ठेवून भाजपमध्ये त्यांचा रेटून पक्षप्रवेश घडवून आणण्याचे राजकीय नाट्य रचले. पण यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना अंधारात ठेवण्याची बातमी समोर आली. सुधाकर बडगुजर यांच्याबरोबरच माजी मंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतले नेते बबनराव घोलप, त्यांची मुलगी माजी महापौर नयना घोलप, मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी देखील मोठे शक्ती प्रदर्शन करून भाजपमध्ये प्रवेश केलेत. त्यामुळे नाशिक मध्ये भाजपचे स्वबळ सध्या कागदावर वाढले.

 3 आमदारांची शक्ती अपुरी

नाशिक शहरात भाजपचे तीन आमदार असले तरी 100 नगरसेवक निवडून आणण्या इतपत त्यांची ताकद नाही म्हणून इतर पक्षातून निवडणूक क्षमतेचे नेते भाजपमध्ये घेऊन स्वबळ वाढवण्यासाठी पक्षाने कुठला फिल्टर लावलेला नाही पण प्रत्यक्ष महापालिका निवडणुकीची उमेदवारी देताना मात्र पक्षाला चाळणी लावावी लागण्याची शक्यता आहे. कारण पक्षात प्रवेश दिलेल्या प्रत्येक नेत्याचा राजकीय इतिहास भाजपला परवडेलच असा नाही. त्यामुळे ऐन निवडणुकीत त्याचा फटका बसायची शंका येताच भाजपला उमेदवारी देताना चाळणी लावावी लागेल.

For incoming in BJP no filter, but while selecting the candidates there may be more filters

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात