• Download App
    महाराष्ट्रातील लॉकडाऊन लागण्याच्या धास्तीने मजुरांची मुंबईतील रेल्वे स्टेशनवर तोबा गर्दी|Fear of lockdown in Maharashtra Toba crowd of workers at the railway station in Mumbai

    महाराष्ट्रातील लॉकडाऊन लागण्याच्या धास्तीने मजुरांची मुंबईतील रेल्वे स्टेशनवर तोबा गर्दी

    वृत्तसंस्था

    मुंबई : परराज्यातील मजुरांनी या लॉकडाऊनच्या धास्तीने पुन्हा गावाकडं परतण्यास सुरुवात केली. त्यामुळे मुंबईत मंगळवारी कुर्ला रेल्वे स्थानकावर मजुरांची प्रचंड गर्दी होती. राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळं राज्य सरकार पुन्हा लॉकडाऊन लावणार हे निश्चित झालं आहे.Fear of lockdown in Maharashtra Toba crowd of workers at the railway station in Mumbai

    त्याची औपचारिक घोषणा झाली नाही. मात्र परराज्यातील मजुरांनी या लॉकडाऊनमुळे पुन्हा मूळ गावाकडं परतण्यास सुरुवात केली.राज्यात बुधवारी रात्रीपासूनच पुन्हा कडक लॉकडाऊनची शक्यता आहे. गेल्या लॉकडाऊनमध्ये हाल होऊ नयेत, यासाठी मजुरांनी गावचा रस्ता धरला आहे.



    यात नेहमीच्या रेल्वेंबरोबरच काही स्पेशल ट्रेनहीआज रवाना केल्या जात आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनसवर मजुरांची गर्दी होती.कुर्ला स्टेशनवरून मंगळवारी एकूण 23 रेल्वे रवाना होणार आहे. त्यामुळं यातून प्रवास करणाऱ्या मजूर, कामगार यांची गर्दी कुर्ला स्टेशनबाहेर होती.

    उन्हाळी गाड्यांमुळे गर्दी वाढल्याचा दावा

    मध्य रेल्वेच्या प्रमुख जनसंपर्क अधिकाऱ्यांनी मात्र उन्हाळ्यातील विशेष रेल्वे आणि दैनंदिन गाड्यांमधीलच हे सर्व प्रवासी असल्याचं सांगितलं. उन्हाळ्यात गावी जाणाऱ्यांची गर्दी आहे असं ते म्हणाले.

    ज्या प्रवाशांचे कन्फर्म बुकींग असेल त्यालाच प्रवासाची परवानगी आहे. तसंच गर्दीमुळे सहा स्थानकांवरील तिकिट काऊंटर बंद केली आहेत. मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्तही तैनात आहे.

    Fear of lockdown in Maharashtra Toba crowd of workers at the railway station in Mumbai

     

    Related posts

    नाशिक जिल्ह्यात उद्या ढगफुटीचा इशारा; शाळा, महाविद्यालये आणि ग्रामीण आठवडे बाजार बंद!!; प्रशासन हाय अलर्ट मोडवर!!

    Lohagad Murder Case : सियाने केतनचा खून करण्यासाठी केली राजा रघुवंशी प्रकरणाची स्टडी; सर्च हिस्ट्रीतून रहस्य उघड; हेही विचारले- पोलिस कोठडीत महिलेला मारहाण होते का?

    Ashadhi Wari 2026 : वारीत अत्यावश्यक रुग्णांकरिता प्रथमच एअर ॲम्बुलन्सची सुविधा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची माहिती