Fadnavis : कृषी खात्यातील बदल्यांचे अधिकार स्वत:कडे घेतले; कृषिमंत्री माणिक कोकाटेंना फडणवीसांनी लावला चाप!

Fadnavis

प्रतिनिधी

मुंबई : Fadnavis वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारे कृषीमंत्री माणिक कोकाटे यांना लगाम घालण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली आहे. कृषी विभागातील बदल्यांचे कोकाटे यांचे अधिकार देवेंद्र फडणवीस यांनी काढून स्वतःकडे घेतले आहेत.Fadnavis

कृषी खात्यांमधील बदल्या आणि अन्य कामांच्या मोठया प्रमाणावर तक्रारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आल्या आहेत. त्यामुळे त्यांनी बदल्यांच्या तक्रारींकडे प्राधान्याने लक्ष दिले आहे.



 

मध्यंतरी कोकाटे यांनी पीए-पीएसच्या नियुक्त्यांवर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला होता. आमचे पीएस-ओएसडी देखील मुख्यमंत्रीच ठरवतात. आमच्या हातात काही राहिलेले नाही.

आता कृषि संचालक, सह संचालक आणि अधिक्षक कृषि अधिकाऱ्याच्या बदलीचे अधिकार मुख्यमंत्री फडणवीसांकडेच असतील. कोकाटे यांनी काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयीही वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे अजित पवारही त्यांच्यावर नाराज आहेत.

Fadnavis took over the power of transfers in the Agriculture Department

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात