मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत फडणवीसच टॉपवर, ठाकरेंपेक्षा चौपट पसंती; तर अजितदादांवर अशोक चव्हाण भारी!!

प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात आत्ताच विधानसभा निवडणुका झाल्या तर शिवसेना-भाजप युतीला बहुमत मिळेल असा सलग दुसऱ्या सर्वेक्षणात निष्कर्ष आला आहे. पण त्या पलीकडे जाऊन मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत 35 % सह देवेंद्र फडणवीस टॉप वर आहेत. त्यांना उद्धव ठाकरे यांच्या पेक्षा दुप्पट – तिप्पट नव्हे, तर चौपट पसंती मिळाली आहे. उद्धव ठाकरे 9% पसंतीचे उमेदवार आहेत. Fadnavis is on top in the race for the post of Chief Minister

महाविकास आघाडीत राष्ट्रवादीचे बरेच मुख्यमंत्री पोस्टर्स वर चढले असले तरी, अजितदादांवर काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांनी मात करून देवेंद्र फडणवीस यांच्या खालोखाल दुसरा नंबर पटकावला आहे. उद्धव ठाकरे यांचा नंबर शेवटून पाहिला आहे. न्यूज एरिना इंडियाने घेतलेल्या सर्वेक्षणात भाजपच सर्वाधिक लाभार्थी ठरला आहे.

या सर्वेक्षणाचा निष्कर्ष असा :

निष्कर्ष : महाराष्ट्रात भाजपचा आतापर्यंतचा उच्चांक गाठणार आहे. मतदानाचा दिवस जसजसा जवळ येईल तसतसे इतरांपैकी कोणीही वाढणार नाही.

  • एकनाथ शिंदे यांचा शिवसेना SS UBT पेक्षा मोठा पक्ष म्हणून उदयास येईल आणि SS UBT पेक्षा तो संपूर्ण महाराष्ट्राचा पक्ष असेल.
  • भाजपा + इतर + अपक्ष 140 च्या आसपास असतील म्हणून भाजपचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.

    मुस्लिम MVA ला जोरदार पाठिंबा देतील म्हणून AIMIM चा स्कोअर 0 असेल.

  • NCP आणि INC दोघेही जागांमध्ये किरकोळ वाढ करतील पण बहुमताच्या जवळ जाणार नाहीत. कारण उद्धव ठाकरे आता कोकणाबाहेर अजिबात मजबूत नाहीत.

    मजबूत स्थानिक उमेदवारांमुळे भाजपने जवळपास 35% जागा जिंकेल.

  • काँग्रेसला MVA चा सर्वाधिक फायदा होत आहे. MVA शिवाय त्यांना 28 जागाही जिंकता येणार नाहीत.

    मुख्यमंत्रीपदासाठी पसंती :

देवेंद्र फडणवीस (35%), अशोक चव्हाण (21%), अजित पवार (14%), एकनाथ शिंदे (12%), उद्धव ठाकरे (9%), OTH (9%).

Fadnavis is on top in the race for the post of Chief Minister

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात