फडणवीस सरकार वरल्या आरोपांच्या गदारोळात महामंडळांचे सत्ता वाटप बिनबोभाट!!

नाशिक : फडणवीस सरकार वरल्या आरोपांच्या गदारोळात महामंडळाचे सत्ता वाटप बिनबोभाट!!, हे महाराष्ट्रातल्या महायुतीच्या फडणवीस सरकारने घडवून आणले.

सरकार मधल्या मंत्र्यांवर हनी ट्रॅप पासून रमी खेळण्यापर्यंत वेगवेगळे आरोप झाले त्यावर महायुतीतल्या सगळ्या पक्षांनी प्रत्युत्तरे दिली पण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्यावर कुरघोडी केली. मराठी माध्यमांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा गदारोळ उठला या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने महामंडळाच्या सत्तेचे वाटप बिन बोभाट उरकून घेतले. महायुतीने महामंडळाच्या वाट सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला. यामध्ये भाजपला 44, शिंदेंच्या शिवसेनेला 33 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 23 महामंडळे देण्याचे ठरले. त्यामुळे महायुती या घटक पक्षांच्या आमदारांना आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना कॅबिनेट दर्जाची पदे मिळण्याचे निश्चित झाले. त्यामुळे महायुतीच्या आमदारांमध्ये खुशीची लाट पसरली. Fadnavis government’



महाराष्ट्रातल्या महापालिका, जिल्हा परिषदा आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने महामंडळाच्या सत्ता वाटपाचा हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मात्र या मुद्द्यावर विरोधकांनी चकार शब्द काढला नाही. कारण त्यांना हा निर्णय कळलाच नाही. ते फक्त महायुतीतल्या चार-पाच मंत्र्यांना टार्गेट करत राहिले. माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांवर विश्वास ठेवून राजकारण साधून घेत राहिले, पण प्रत्यक्षात सत्तेचे राजकारण महायुतीने साधून घेतले. त्यामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांना काही बोलताच आले नाही. किंवा त्यावरून सरकारची खेचता आली नाही.

100 महामंडळाचे सत्ता वाटप

वास्तविक महाराष्ट्रातल्या 100 महामंडळाचे सत्ता वाटप म्हणजे आमदार आणि पदाधिकाऱ्यांसाठी कॅबिनेट दर्जाच्या पदांची सोय. ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळत नाही, त्यांची सोय लावण्यासाठी सत्तारूढ आघाडीतल्या घटक पक्षांना वेगवेगळी महामंडळे उपयोगी पडतात. त्यासाठी सुद्धा मंत्रिपदांच्या एवढीच खेचाखेच चालते.

ही खेचाखेच महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये होती. त्यावरून खरं म्हणजे महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना महायुतीची जास्त खेचता आली असती. पण महाविकास आघाडीचे नेते फक्त चार-पाच मंत्र्यांना टार्गेट करत राहिले आणि महाराष्ट्रातल्या आरोप प्रत्यारोपांच्या सगळ्या गदारोळात महायुतीतल्या घटक पक्षांनी महामंडळाची सत्ता बिनबोभाट वाटून घेतली. महामंडळाच्या सत्ता वाटपाचा फॉर्म्युला परस्पर निश्चित करून टाकला. ज्याची साधी भनक देखील महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना लागली नाही.

Fadnavis government’s Varlya allegations, Gadarolaat Mahamandal’s power distribution, Binbobhat!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात