विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्रातल्या मोदी सरकारने पुढाकार घेऊन राबविलेल्या मेक इन इंडिया या उपक्रमाला महाराष्ट्रात सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतोय. Fadnavis
या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्र पुढे यावा यासाठी महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीस सरकारने विशेष प्रयत्न केले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र शासन आणि इव्हॉल्व्ह 3 होल्डिंग्ज यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार लॅपटॉप, टॅबलेट आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्यात येणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रात रोजगार निर्मिती वर सुद्धा भर देण्यात आला आहे.
सामंजस्य कराराची वैशिष्ट्ये :
– गुंतवणूक : ₹600 कोटी
– रोजगारनिर्मिती : 1075
– नवी मुंबई, पुणे आणि नागपूर येथे उत्पादन सुविधा
यावेळी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री योगेश कदम, इव्हॉल्व्ह 3 होल्डिंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी रे पाओला आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App