वैराग्याच्या काळातही बगल में छुरी घेऊन फिरतात; गोपीचंद पडळकर यांची शरद पवार यांच्यावर टीका

विशेष प्रतिनिधी

मुंबई : कारण एकीकडे ते आपल्या वयाच्या थोरल्यापणाची मानाची अपेक्षा ठेवतात अन दुसरीकडे वैराग्याच्या काळातही बगल में छुरी घेऊन फिरतात, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे. Even in times of old age, they carry knives ; Gopichand Padalkar’s criticism of Sharad Pawar

शरद पवार यांना पुणे मेट्रोच्या कार्यक्रमात आमंत्रित न केल्यामुळे किंबहुना सन्माननीय पवार साहेब हताशपणे बोलले असतील. आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवरती यांचा राग यामुळेच आहे. की माझ्यासारखा धनगराचा पोरगा असो की शेतकऱ्यांचा सुपुत्र सदाभाऊ असो की वंचितांचा पुत्र राम सातपुते असो यांना देवेंद्रजींनी सत्तेच्या प्रवाहात पुढे आणले. त्यामुळेच प्रस्थापितांचा तिळपापड होतोय. म्हणूनच आमचे बहुजन हितचिंतक देवेंद्रजी यांच्या नजरेत खुपतात.



मी पवार साहेबांना सांगतो की फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात भाजपाचे १०५ आमदार तर शिवसेनेचे ५६ अशे एकूण १६१ आमदार महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना पुन्हा आणण्याकरताच निवडून दिले होते. पण आपल्या नेतृत्वात पावसात भिजून सुद्घा फक्त ५४ च आमदार निवडून आले. त्यामुळे जनतेने तुम्हालाच निवडून दिले अशा खोट्या थापा मारू नका. आपण म्हणता मी पुन्हा येऊ देणार नाही पण तुमच्या पक्ष स्थापनेपासून गेल्या तीसवर्षात तुम्हाला आजपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रावादीचा मुख्यमंत्रीही बसवता आला नाही. सत्तेसाठी पडती भूमिका घेणं सोपं असतं पण लोकहितासाठी सक्षम भूमिका घेणं कठीण असतं.

Even in times of old age, they carry knives ; Gopichand Padalkar’s criticism of Sharad Pawar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात