महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांच्या निवडणूका जाहीर; 15 जानेवारीला मतदान 16 जानेवारीला मतमोजणी!!

municipal corporations

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांच्या निवडणुका आज राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या त्यानुसार 15 जानेवारी 2026 ला सर्व महापालिकांसाठी मतदान होणार असून 16 जानेवारी 2026 ला मतमोजणी होणार आहे. राज्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी वाघमारे यांनी ही घोषणा केली. municipal corporations

महाराष्ट्रात दिनांक 23 डिसेंबर 2025 पासून ते 16 जानेवारी 2026 पर्यंत बृहन्मुंबई महापालिकेसह सर्व 29 महापालिकांच्या निवडणुका होतील. त्यासाठी आजपासूनच आचारसंहिता लागू केली आहे.

उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा बदलण्यात आली असून अ वर्ग ते ड वर्ग महापालिकांमध्ये ती वेगवेगळी असणार आहे. ते 9 लाख ते 15 लाख अशी वर्गीकृत केली आहे.

निवडणूक कार्यक्रम असा :

  •  निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचे दिवस : 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025
  •  अर्जांची छाननी : 31 डिसेंबर 2025
  •  उमेदवारी मागे घेण्याची मुदत : 2 जानेवारी 2026
  •  उमेदवारांना चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी : 3 जानेवारी 2026
  •  मतदानाचा दिवस : 15 जानेवारी 2026
  •  मतमोजणीचा दिवस : 16 जानेवारी 2016

Elections have been announced for 29 municipal corporations in Maharashtra.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात