Eknath Shinde : शिवसेना हिंदूहृदय सम्राटांची, टोमणे सम्राटांची नाही; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Eknath Shinde

विशेष प्रतिनिधी

भंडारा : Eknath Shinde सोन्याचा चमचा तोंडात घेऊन मी जन्माला आलो नसलो, तरी मी जनतेला सोन्याचे दिवस दाखविले आहे. शिवसेना हा मालक-नोकरांचा पक्ष नाही, तर सच्चा शिवसैनिकांचा व कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हा एकनाथ शिंदे सामान्य कार्यकर्ता आहे. हा पक्ष तुमचा आहे, इथे काही कुणी मालक नाही. राजा का बेटा राजा नहीं बनेगा असे श्रीकांत शिंदेही म्हणाले होते. ही शिवसेना हिंदूहृदय सम्राटांची आहे, टोमणे सम्राटांची नाही. मी सीएम असताना म्हणत होतो की, मी कॉमन मॅन आहे. आता मी डीसीएम आहे. म्हणजेच डेडिकेटेड कॉमन मॅन. वाघाचे कातडे पांघरून वाघ होता येत नाही. घरी बसणाऱ्यांना जनतेने घरीच बसवले आहे. कॉमन मॅन बनण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंचेच विचार लागतात. ज्याने बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले त्यांना त्याची प्रचिती आली आहे, असा टोला भंडाऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.Eknath Shinde

‘एक बार कमिटमेंट कर दी, तो मै अपनी आप की भी नही सुनता’ या सिने डॉयलागने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भंडारावासियांचे आभार मानत विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आभार सभा भंडाऱ्याच्या रेल्वे मैदानात पार पडली. यावेळी ते बोलत होते. भंडारा- पवनी विधानसभा निवडणुकीत आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या झालेल्या विजयात कार्यकर्त्यांसह भंडारावासियांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.



भंडारावासियांचे आभार मानताना एकनाथ शिंदे म्हणाले की, पवनी- भंडारा हा वाघांचा जिल्हा आहे. मात्र, मागील विधानसभा निवडणुकित विरोधकांनी खरी शिवसेना कोणती यावरून रान उठवले होते. आम्ही जनतेच्या दरबारात जाऊन न्याय मागू अशी पोकळ वल्गना विरोधक करत होते. पण जनताही सुज्ञ आहे, याची जाणीव सुरुवातीपासूनच आम्हाला होती, म्हणूनच भंडारा- पवनी येथील मतदारांनी सच्चा शिवसैनिक भोंडेकर यांना भरघोस मतांनी निवडून देत खरी शिवसेना कोणती याची पावती दिली. वाघाचे कातडे पांघरुण लांडगा कधी वाघ बनू शकत नाही याची प्रचिती आपण भंडारेकरांनी दिली. त्याबद्दल मी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आपले आभार मानायला आलो असल्याचे शिंदे आपल्या भाषणात म्हणाले.

यावेळी व्यासपीठीवर राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, आमदार मनिषा कायंदे, आमदार नरेंद्र भोंडेकर, माजी आमदार कोरोटे, माजी आमदार चंद्रिकापूरे, संजय कुंभलकर, डॉ. अश्विनी भोंडेकर, पद्माकर बावणकरसह शिवसेनेचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

व्यासपीठ हे वैभव तर कार्यकर्ता हे ऐश्वर्य व संपत्ती

राजकारणात आपला मोठा वारसा आहे, असे सांगणाऱ्यांना महाराष्ट्रातील मायबाप जनतेने आरसा दाखविला आहे. अशा मायबाप जनतेला मी भेटायला आलो असल्याचे ते म्हणाले. कारण मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. अडीच वर्षांपूरवी एक शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला, पण मी कार्यकर्ता म्हणून काम केले. कालही कार्यकर्ता म्हणून काम केले, आजही कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. कारण कार्यकर्ता हा असा व्यक्ती आहे की, तो या व्यासपीठावर बसलेल्यांना नेता, आमदार, खासदार व मंत्री बनवतो. त्यामुळे व्यासपीठ हे वैभव असले तरी कार्यकर्ता हे ऐश्वर्य व संपत्ती आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना जपले पाहिजे असा सल्ला यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना दिला.

स्थानिक स्वराज्य संस्थेत भगवा फडकवा

भगवा म्हणजे एक विचार आहे, भगवा म्हणजे झंझावात, भगवा म्हणजे तलवारीची धार आहे, भगवा म्हणजे जिजाऊचा आशीर्वाद आहे, हे लक्षात ठेवा. विधानसभेत जसा भगवा फडकवला तसाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भगवा फडकवण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केले.

Eknath Shinde Targets Uddhav Thackeray: Shiv Sena Belongs to Sainiks

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात