विशेष प्रतिनिधी
मुंबई : Eknath Shinde मराठी भाषेबाबत आम्ही कधीही तडजोड करणार नाही, मराठी माणसाच्या हक्कांवर गदा आली तर ती सहन केली जाणार नाही, असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मुंबईत पार पडलेल्या शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पक्षातील मंत्र्यांना आणि आमदारांना देखील कानपिचक्या दिल्या. विरोधकांना एक्स्पोज करताना स्वतः एक्स्पोज होऊ नका, असे एकनाथ शिंदे मंत्र्यांना म्हणाले.Eknath Shinde
शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी निवड करण्यात आली. तसेच शिवसेना नेहमीच मराठी माणसाच्या हक्कासाठी आग्रही असल्याचा ठरावही या बैठकीत संमत करण्यात आला. या बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना एकनाथ शिंदे यांनी मराठी माणसाच्या उद्धारासाठी सर्वकाही करणार असल्याचा निर्धार केला.
नेमके काय म्हणाले एकनाथ शिंदे?
आपण मराठी भाषेबाबत कधीही तडजोड सहन करणार नाही, मराठीची गळचेपी सहन करणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मराठी माणसाच्या उद्धारासाठी जे काही करायचे ते आपण करणार, दिलेला शब्द आपण पाळतो त्यामुळे मराठी माणूस आपल्यासोबत आहे असेही शिंदे म्हणाले.
आपल्यात शिवसैनिक हे पद सर्वात मोठे आहे हे लक्षात ठेवा. कार्यकर्ता हा नेता तयार करतो, पक्ष घडवतो. त्यामुळे कार्यकर्त्याला जपले पाहिजे. एकटा माणूस मोठा होऊन पक्ष मोठा होत नाही. कार्यकर्त्याला मोठं केलं की पक्षही आपोआप मोठा होतो. नेता, आमदार, मंत्री झालो ही हवा डोक्यात जाऊ देऊ नका, कायम कार्यकर्ता म्हणूनच काम करा, असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी दिला.
मंत्र्यांना आणि आमदारांना शिंदेंच्या कानपिचक्या
दरम्यान, शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल बोलताना खळबळजनक विधान केले होते. नारायण राणे एवढ्या उंचीवर सहजासहजी गेले नाहीत. त्यांनी मर्डर केले, भानगडी केल्या, तुरुंगातही गेले, अशा शब्दांत गोगावले व्यक्त झाले होते. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात शिवसेनेच्या मंत्र्यांना आणि आमदारांना कानपिचक्या दिल्या.
आपण कमी बोलू आणि जास्त काम करू तेवढे चांगले. विरोधकांना एक्स्पोज करताना स्वतः एस्पोज होऊ नका. तुमचा चुकीचा शब्द पक्षाला अडचणीत आणतो. आपण एवढे मोठे यश मिळवले ते चुकीचे बोलून घालवू नका. शिस्तीला तडा जाईल असे काही करू नका, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
घर तिथे शिवसैनिक आणि गाव तिथे शाखा
एकनाथ शिंदे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुकांसाठी तयारी करण्याचे आवाहन केले. , “निवडणुकांसाठी सज्ज व्हा, एकदिलाने काम करायचे आहे, निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार हवा. उमेदवार चुकला की संपले. जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करा. नोंदणी करताना प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी उद्दिष्ट ठरवून नोंदणी करा. शाखेचे जाळे बाळासाहेबांनी, दिघेसाहेबांनी घट्ट केले आहे. शाखा ही लोकांना आधार वाटते. कंटेनर शाखेचा कॉन्सेप्ट ठिकठिकाणी राबवा. ‘घर तिथे शिवसैनिक आणि गाव तिथे शाखा’ ही झालीच पाहिजे, असेही ते म्हणालेत.
Eknath Shinde Cautions Ministers: Avoid Self-Exposure
महत्वाच्या बातम्या
- Nitish Kumar : कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून ‘जेडीयू’ने साधला ममता बॅनर्जींवर निशाणा
- T Raja Singh : तेलंगणात भाजप आमदार टी राजा सिंह यांनी दिला राजीनामा
- Finance Minister Sitharaman : भारत-अमेरिका व्यापार करारावर अर्थमंत्री सीतारामन यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या..
- Maharashtra to Telangana : महाराष्ट्रापासून तेलंगणापर्यंत ५ राज्यांमध्ये भाजपने अध्यक्षांची केली नियुक्ती