विशेष प्रतिनिधी
पुणे : पाकिस्तानातून सुटलेल्या धुळीचे वादळ थेट महाराष्ट्रात धडकले. पाकिस्तानकडून निघालेले हे धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्रमार्गे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले. यामुळे कोकणात पाऊस तर मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात थंड वारे सुरु झाले आहेत. यामुळे उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात धुळीचे साम्राज्य पसरले. याशिवाय मुंबई-पुण्यात धुलीकणांचे प्रमाण वाढल्याची नोंद झाली आहे. Dust storm from Pakistan in Maharashtra including Pune
उत्तरेकडील पाकिस्तान मध्ये निर्माण झालेल्या धुळीच्या वादळाचा फटका महाराष्ट्रालाही बसला. गुजरात मार्गे आलेल्या धुळीचे साम्राज्य मागील काही दिवसांपासून पालघरजवळील परिसराला सर्वत्र पसरले आहे. त्यामुळे वातावरण प्रदूषित झाले आहे. हे वातावरण पुढील दोन दिवस राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पालघरसह राज्यातील अनेक जिल्ह्यात धुळीचे वादळ पसरले. बुलढाणा जिल्ह्यात दुपारपासून अचानक जोरदार वाऱ्यासह धुळीच वादळ पाहायला मिळत आहे. खामगाव शहरात धुळीच्या वादळामुळे हवा दूषित झाल्याची दिसून येत आहे. धुळीचे वादळ पाकिस्तानातून धुलीकण घेऊन हवेत पसरले आहे. यामुळे समोरचे दिसणे कमी झाले आहे. शिवाय अधूनमधून ढगही ये-जा करत आहेत. यामुळे सूर्यप्रकाशही कमी प्रमाणात पसरला आहे.
धुळीचे वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांना मास्क घालण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच, विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून निसर्गाने थंडी, पावसाची बरसात सुरु केली आहे. गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रासह देशभरात कुठे दाट धुके, कुठे अवकाळी पाऊस तर कुठे कडाक्याची थंडी पडत आहे.
Dust storm from Pakistan in Maharashtra including Pune
महत्त्वाच्या बातम्या
- भाजपच्या अनेक नेत्यांनी फडकविले बंडाचे निशाण; ५९ उमेदवारांची यादी जाहीर , उत्तराखंडात दलबदलूंना प्राधान्य
- वाऱ्याचा पश्चिमी प्रकोप : सौराष्ट्राच्या वाळवंटातील वाळू मुंबई आणि नाशिकमध्ये
- अरुणाचल प्रदेशातील हरवलेला मुलगा चिनी सैन्याला सापडला; भारताकडे सुपूर्त करणार
- लातूरमधील एका शिक्षकाने ग्रुपवर स्वतःचा फोटो टाकून दिली भावपूर्ण श्रध्दांजली