विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत ठाकरे बंधूंची नववी का दहावी भेट झाली दोघांमध्ये शिवतीर्थयावर काही चर्चा झाली त्यावर मराठी माध्यमांनी भरपूर पतंग उडवले पण मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सगळ्या पतंगांची कन्नी कापली.Don’t fly the kites of news of Thackrey brother alliance
ठाकरे बंधूंमध्ये चर्चा झाली त्यामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक आदी महापालिकांमध्ये शिवसेना मनसे अशी युती करून निवडणूक लढवायचा निर्णय झाला त्याच्या तपशीलवार बातम्या मराठी बातम्यांनी सूत्रांच्या हवाल्याने दिल्या. त्याचवेळी मुंबईतल्या 80 जागांवर दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षांमध्ये पेच निर्माण झाल्याचा दावा मराठी माध्यमांनी केला. या 80 जागांवर शिवसेना आणि मनसे यांची समसमान ताकद आहे त्यामुळे दोन्ही पक्षांनी त्या जागांवर दावा करून आपल्या पक्षाला जास्तीत जास्त जागा खेचायचा प्रयत्न चालविला आहे अशा दावा या बातम्यांमधून करण्यात आला.
पण मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी माध्यमांच्या सगळ्या बातम्या फेटाळून लावल्या. ठाकरे बंधूंमध्ये नेमकी काय चर्चा झाली, ती फक्त उद्धव आणि राज ठाकरे यांनाच माहिती आहे. बाकी कुणालाही त्याची माहिती नाही. संक्रांत अजून लांब आहे. त्यामुळे उगाच आत्तापासून बातम्यांचे पतंग उडविण्यात मतलब नाही, असा टोमणा संदीप देशपांडे यांनी मराठी माध्यमांना हाणला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App