नागराज मंजुळेंचा नवा सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला


विशेष प्रतिनिधी

पुणे : आपल्या ताकदीच्या दिग्दर्शनातून मराठी मनोरंजन विश्वाला वेगळ्या कलाकृतीला देणारा आणि आपल्या दिगदर्शनाचीं वेगळी छाप सोडणारा दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे.Director Nagraj manjule’s new film

नागराज च्या सैराट या सिनेमानं मराठी मनोरंजन चित्रपट विश्वात मोठा इतिहास रचला . आणि सैराटमुळे मराठी चित्रपटाला मोठा यश चाखायची संधी मिळाली .

नागराज चा अभिनय असलेला घर बंदूक बिर्याणी हा सिनेमा नुकताच येऊन गेला. या सिनेमावर काही प्रमाणात समीक्षकांकडून टीका झाली मात्र प्रेक्षकांच्या पसंती हा सिनेमां उतरला . आई मुलाची हळवी कहाणी सांगणारा नाळ हा सिनेमा देखील प्रेक्षकांनी चांगलाच उचलून धरला.

याच सगळ्या सुपरहिट कलाकृती देणाऱ्या नागराज मंजुळे यांचा नवा सिनेमा ‘बापल्योक’ लवकरच आपल्याल भेटीला येतोय.राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे आणि मकरंद शशिमधू माने ही दोन नावं ठळकपणे समोर येतात. रोजच्या जगण्याचं प्रतिबिंब, समाजातील वास्तव, सोबत मानवी भावभावना आपल्या चित्रपटांमधून दाखवताना आपल्या मातीशी असलेली नाळ या दोघांनी कायम जपली. चित्रपटसृष्टीतील हे दोन मातब्बर दिग्दर्शक आता ‘बापल्योक’ या मराठी चित्रपटासाठी एकत्र आले आहेत.

25 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘बापल्योक’ या चित्रपटाचे नागराज मंजुळे प्रस्तुतकर्ते आहेत.‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे, आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Director Nagraj manjule’s new film

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*