• Download App
    No Need to Panic Over Fuel; MLC Polls Together: CM Devendra Fadnavis मोदींवर विनाकारण टीका नको, पवारांचे विधान महत्त्वाचे; विधान परिषद महायुती एकत्रित लढणार, इंधनाचा तुटवडा नाही, जनतेने घाबरू नये- सीएम फडणवीस

    CM Devendra Fadnavis : मोदींवर विनाकारण टीका नको, पवारांचे विधान महत्त्वाचे; विधान परिषद महायुती एकत्रित लढणार, इंधनाचा तुटवडा नाही, जनतेने घाबरू नये- सीएम फडणवीस

    CM Devendra Fadnavis

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : CM Devendra Fadnavis पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवरून होणाऱ्या टीकेचा समाचार घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विधानाचा दाखला दिला आहे. पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यांवर अनेक महत्त्वाचे करार करत असून, त्यामुळे देशाचे भवितव्य सुरक्षित झाले आहे. म्हणूनच पंतप्रधानांवर विनाकारण टीका करू नका, ते देशाच्या हिताचे काम करत आहेत असे शरद पवारांनी म्हटले होते आणि त्यांचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे आहे,असे फडणवीस म्हणाले. याचवेळी राहुल गांधींवर टीका करताना ते म्हणाले की, राहुल गांधी हे रिजेक्टेड माल आहेत. मी मागच्या वेळी त्यांच्यावर अशी टीका केली तेव्हा शरद पवारांना राग आला होता आणि मुख्यमंत्र्यांनी असे शब्द वापरू नयेत, असा सल्ला त्यांनी दिला होता.CM Devendra Fadnavis

    विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या ऐक्यावर भर दिला. महायुतीमधील तिन्ही पक्षांनी ही निवडणूक एकत्रितपणे लढली पाहिजे, असे आमचे स्पष्ट मत आहे. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र बसून जागावाटप आणि रणनीतीवर योग्य निर्णय घ्यावा, असा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.CM Devendra Fadnavis



    पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नाही

    सीएम फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारकडे पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे जनतेने विनाकारण घाबरून जाण्याचे (पॅनिक होण्याचे) कारण नाही. जेव्हा लोक अफवांवर विश्वास ठेवून गरजेपेक्षा जास्त पेट्रोल भरू लागतात, तेव्हा इंधनाची सप्लाय चेन तात्पुरती विस्कळीत होते. याचा अर्थ साठा संपला असा होत नाही. जागतिक परिस्थिती बिकट असतानाही केंद्र सरकारने आपली पुरवठा साखळी मजबूत ठेवली आहे. त्यामुळे नागरिकांनी इंधनाचा गैरवापर टाळावा आणि अफवांना बळी पडू नये.

    पोलिसांच्या इंधन पुरवठ्यात कोणतीही कमतरता नाही

    पोलिस वाहनांना पेट्रोल मिळत नसल्याच्या चर्चेचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी खंडन केले. पोलिसांसाठी सर्व ठिकाणी पुरेशा प्रमाणात पेट्रोल-डिझेल उपलब्ध आहे. नागपूरमध्ये घडलेल्या एका घटनेचा उल्लेख करत ते म्हणाले की, नागपूरमध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याने पेट्रोल शिल्लक असतानाही अत्यंत चुकीचे उत्तर दिले होते. या बेजबाबदार वर्तनामुळे संबंधित कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्यात आली आहे.

    No Need to Panic Over Fuel; MLC Polls Together: CM Devendra Fadnavis

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Shashikant Shinde : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा विषय संपलाय, शरद पवार गटाच्या बैठकीनंतर शशिकांत शिंदेंचे मोठे विधान

    Chhagan Bhujbal : राज्यात 1 महिना पुरेल एवढाच इंधन साठा; अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती; विरोधकांची स्थिती स्पष्ट करण्याची मागणी

    Maharashtra : शेतकरी कर्जमाफी 30 जूनपूर्वी होणार; कृषिमंत्री भरणे म्हणाले- आचारसंहितेचा अडथळा नाही, CM फडणवीस सकारात्मक निर्णय घेतील