विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील विविध महत्त्वाच्या घडामोडींवर सविस्तर भाष्य केले. नागपूरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरस्थिती, मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेले आंदोलन आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन या सर्वच मुद्द्यांवर त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. विशेष म्हणजे, राज्यातील आंदोलक विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश त्यांनी गृह विभागाला दिले आहेत, असे स्पष्ट करत त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे.Devendra Fadnavis
आंदोलक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
राज्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे. ते म्हणाले की, राज्यात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनांदरम्यान ज्या विद्यार्थ्यांवर पोलिसांत केसेस दाखल झाल्या आहेत, त्या सर्व केसेस मागे घेण्याचे आदेश मी पोलिस आणि गृह विभागाला दिले आहेत. तसेच, या सर्व आंदोलनांदरम्यान महाराष्ट्र पोलिसांनी अतिशय संयमाची भूमिका घेतल्याचेही त्यांनी सांगितले.Devendra Fadnavis
नागपूरमधील पूरस्थिती आणि रेस्क्यू ऑपरेशन
नागपूर शहरात झालेल्या ढगफुटीसदृश पावसावर फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली. “नागपुरात एका महिन्याचा पाऊस अवघ्या एकाच दिवसात पडला आहे. यामुळे शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले असून, ३ शाळांमध्ये तर विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवावे लागले, अशी माहिती त्यांनी दिली. शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळेही काही ठिकाणी पाणी साचल्याची कबुली त्यांनी दिली. तसेच, आजही संध्याकाळी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
जरांगे पाटलांच्या शंका दूर करू
मराठा आरक्षणासाठी कुणबी जात प्रमाणपत्रांच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा आणि आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, “महायुती सरकारने मराठा समाजाच्या हितासाठी जे ऐतिहासिक निर्णय घेतले, ते यापूर्वी कोणत्याही सरकारने घेतले नव्हते. असे असले तरी, जर मनोज जरांगे पाटील यांच्या मनात अजूनही काही शंका किंवा सरकारबद्दल रोष असेल, तर आम्ही त्यावर चर्चेतून नक्कीच योग्य मार्ग काढू.
राहुल गांधींवर घणाघाती टीका
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी थेट शब्दांत हल्लाबोल केला. “राहुल गांधी यांच्या भाषणात कधीही काहीही नवीन नसते. देशात केवळ अराजकता माजवणे हा एकच अजेंडा घेऊन राहुल गांधी सध्या काम करत आहेत,” अशी टीका फडणवीस यांनी केली.
Devendra Fadnavis Appeals to Manoj Jarange Patil, Highlights Mahayuti’s Work for Maratha Community
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिडिओ हटविला चुकीने, Meta ची माफी; पण इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाचे Meta ला समन्स!!
- PoK Assembly : पीओकेत निवडणुकीत हिंसाचार, गोळीबार; 1 ठार, अनेक जखमी, घोटाळ्याच्या आरोपांमुळे वाद वाढला
- धर्मेंद्र प्रधानांच्या खाते बदलाच्या बातम्या चुकीच्या; भाजपच्या प्रवक्त्यांचा अधिकृत खुलासा!!
- CJP आंदोलनातल्या हिंसाचाराच्या स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशीचे सुप्रीम कोर्टाचे आदेश!!; देशद्रोही घटकांना चाप!!