विशेष प्रतिनिधी
मुंबई: Devendra Fadnavis जोपर्यंत हे लोक सत्य पचवत नाहीत तोपर्यंत त्यांचा पराभव होत राहणार, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केला आहे.Devendra Fadnavis
बिहारच्या निवडणुकीत भाजप व एनडीए आघाडीने विक्रमी बहुमत मिळविले आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजप आणि एनडीए या सर्व घटक पक्षांच्या बिहार युनिटचे मी अभिनंदन करतो आणि बिहारच्या जनतेचे आभार मानतो. त्यांनी मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन, नितीश कुमार यांच्या सुशासनावर विश्वास ठेऊन आणि आमच्या घटक पक्षाला त्या ठिकाणी एनडीएच्या माध्यमातून प्रचंड मोठे बहुमत दिले आहे. 2010 चा सुद्धा रेकॉर्ड तुटू शकेल इतके बहुमत मिळाले आहे.Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस म्हणाले, दुसरे महत्त्वाचे असे आहे की या विजयानंतर खऱ्या अर्थाने कॉंग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनी देशात जो विषारी प्रचार चालवला आहे, त्याला जनतेने उत्तर दिले आहे. सातत्याने संवैधानिक संस्थांचा अपमान करणे, जनतेच्या मॅनडेटला विरोध करणे, कुठेतरी जनतेला हे लक्षात येत आहे की आम्ही ज्या सरकारला निवडून देतो हा त्या सरकारचा अपमान नाही तर आमच्या मताचा अपमान आहे. कॉंग्रेस एमआयएम पेक्षाही खाली गेली आहे. मला असे वाटते की कॉंग्रेसचा बिहारच्या इतिहासात सर्वात कमी मत मिळाली आहेत.
राहुल गांधी यांनी तिथे मतचोरी मुद्दा चालवला, त्यावर त्यांनी यात्रा काढली, नदीत उडी टाकली. पण लोकांचा विश्वास हा मोदींवर आणि नितीश कुमार यांच्यावर आहे. मला असे वाटते की जोपर्यंत कॉंग्रेस आणि त्यांच्यासोबतचे पक्ष जोपर्यंत आत्मपरीक्षण करत नाहीत तोपर्यंत ते निवडून येऊ शकत नाहीत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
फडणवीस म्हणाले, विकास आणि सुशासन हाच प्रमुख मुद्दा ठरला आहे. आणि हे लक्षात येत होते की खूप चांगल्या परिस्थितीत एनडीए आहे. पूर्वीपेक्षा जास्त चांगली परिस्थिती यावेळी दिसून आली आहे. अक्षरशः त्याचा निकाल आज आपण पाहत आहोत. मला असे वाटत होते की आपण 160 च्या पुढे जाऊ, पण त्याही पेक्षा आपण पुढे गेलो आहोत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App